{
  "village_code": "270100030004280000",
  "village_name": "सेलिंगपुर",
  "taluka_name": "तळोदे",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 605,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:54:55Z",
  "surveys": [
    "66/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/182/2026 तहसिल कार्यालय तळोदा\nआदेश दिनांक : 23/10/2026\nवाचले:\n-1. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस-14/2161816/प्र.क्र.458 सप्टेंबर 1992\n2. श्री. काशिराम सुऱ्या मोरे रा. सेलिंगपूर ता. तळोदा जि. नंदुरबार यांचा दि. 10/12/20\n3. मंडळ अधिकारी बोरद यांच्या कडील अहवाल जा. क्र. / जमिन/कावि-58/2026 दि.30/06/2026\nक्रमांक/जमीन/कावि/182/2026\nतहसिल कार्यालय तळोदा\nआदेश\nअर्जदार श्री. काशिराम सुऱ्या मोरे रा. सेलिंगपूर ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी त्यांचे मालकीची शेतजमीन मौजे सेलिंगपूर ता. तळोदा शिवारातील गट नं. 66/25 क्षेत्र 3.05 हे. आ आकार 0.00 रु. पै. या शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर सौ. केलीबाई काशिराम मोरे यांचे नाव सहखातेदार म्हणुन लावणे बाबत इकडेस दिनांक 10/12/2025 रोजी विनंती अर्ज सादर केला आहे.\nसदर अर्जाची मंडळ अधिकारी बोरद यांनी स्थानिक चौकशी करुन त्यांचेकडील जा. क्र./जमिन/कावि-58/2026 दि.30/06/2026 अन्वये अहवाल इकडेस सादर केलेला आहे. सदर अहवालाचे अवलोकन केले असता श्री. काशिराम सुऱ्या मोरे रा. सेलिंगपूर ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी त्यांचे मालकीची शेतजमीन मौजे सेलिंगपूर ता. तळोदा शिवारातील गट नं. 66/25 क्षेत्र 3.05 हे. आर. पो.ख. 0.00 रु. पै. या शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर सौ. केलीबाई काशिराम मोरे यांचे नाव सहखातेदार म्हणून लावणेबाबत मंडळ अधिकाऱ्यांनी अर्जदाराचा जबाब व पंचनामा सादर केला आहे. तसेच पुरावा म्हणून 100 मात्रचे मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, रेशनकार्ड ही कागदपत्रे सादर केलेली आहेत.\nसबब, महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे \"लक्ष्मी अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा म्हणुन 7/12 उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद व्हावी. त्याकरीता मी तहसिलदार तळोदा प्रस्तुत प्रकरणी मौजे सेलिंगपूर येथील गट नं. 66/25 आर. पो.ख. 0.00 आकार 0.00 रु. पै. या शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर सौ. केलीबाई काशिराम मोरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणुन लावणेकरीता महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमांच्या अधीन राहून गांवी अधिकार अभिलेखात योग्य ती नोंद करुन ७/१२ उतारा सादर करणे बाबत याव्दारे आदेशित करीत आहे.\nवरील आदेशयान्वये सदर नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "प्रमिला मोतू नाईक"
}
