{
  "village_code": "270100050006340000",
  "village_name": "ईसाईनगर",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1072,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:54:24Z",
  "surveys": [
    "2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. तहसिलदार यांचेकडील आदेश क्रमांक/2026/जमीन-1/कलम85/कावि-66, तहसिल कार्यालय, नंदूरबार दिनांक- 16/10/2026 अन्वये मौजे ईसाईनगर येथील अर्जदार चित्राबाई जालमसिंग वळवी यांनी त्यांच्या गट नं. 2/4 क्षेत्र 1.10 हे.आर. आकार 4.25 रू.पै. हया शेतजमीनीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात राजी खुशीने वाटणी करून घेत व देत आहे. अशी खात्री झाल्याने व सदर वाटणी मुळे मुंबई कुळ वहिवाट कायदा व तुकडेबंदी व कायदा व सिलींग एरिया कायद्याचा भंग होत नसल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे सदर जमिनीच्या वाटणीस खालील परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे व खालील अटीस अधीन राहून परवानगी देत आहे\n7/12 वरील सद्यस्थिती\nगावाचे नाव :- ‍ईसाईनगर\nग.नं. :- 2/4\nएकुण क्षेत्र :- 1.10\nपोटखराब क्षेत्र :- 0.00 हे.आर\nआकार :- 4.25 रू.पै.\nकब्जेदाराचे नाव :- चित्राबाई जालमसिंग वळवी\nवाटणीनंतरची स्थिती\n1) गावाचे नाव :- ‍ईसाईनगर\nग.नं. :- 2/4\nएकुण क्षेत्र :- 0.90\nपोटखराब क्षेत्र :- 0.00 हे.आर\nआकार :- 3.85 रू.पै.\nकब्जेदाराचे नाव :- विक्रमसिंग जालमसिंग वळवी\n2) गावाचे नाव :- ‍ईसाईनगर\nग.नं. :- 2/4\nएकुण क्षेत्र :- 0.20\nपोटखराब क्षेत्र :- 0.00 हे.आर\nआकार :- 0.40 रू.पै.\nकब्जेदाराचे नाव :- चित्राबाई जालमसिंग वळवी\nआदेशातील अटी व शर्ती :- 1. वरील प्रमाणे वाटणी इतर हक्कातील शर्ती/हक्क कायम ठेवुन संबधीतांना वर्दी नोटीसा बजावुन तसेच सोसायटी/तसेच बँकेचे बोजे असल्यास सोसायटी/बँकाचे संमती पत्र किंवा बोजे कमी करूनच फेरफार नोंदविण्यात यावा.\n2. शिवाय विभाजनामुळे पोटहिस्सा होत असल्यास संबधिताकडुन मोजणी फी भरल्याचे चलन मागवुन नंतरच फेरफार प्रमाणित करण्यात यावी.\n3.सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्रक व जबाबानुसार त्यांनी केलेल्या विवेचनावरून पारित करण्यात आलेला आहे. याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आर टी एस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश/नोंद रद्द समजण्यात येईल व त्यास संबंधीत वाटणीधारक जबाबदार राहतील.\n4. जर सदर गटावर कुळ कायदा, इनाम व वतन जमिन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील. त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा/तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधित तलाठी यांनी घ्यावी.\n5. जर सदरची जमीन लाभदायक क्षेत्रात येत असेल तर महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, शासन निर्णय क्र. आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दि.11.02.2022 अन्वये सदर शेतजमीनींच्या 7/12 वर इतर अधिकारात “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंघाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” ही नोंद घेण्यात यावी,\n6. तसेच उक्त नमुद अटी शर्ती ह्या फेरफार नोंद घेताना नमुद करण्यात यावा.",
  "talathi": "एल. जे. वळवी"
}
