{
  "village_code": "270100050007080000",
  "village_name": "ढंढाणे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:24:56Z",
  "surveys": [
    "60/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/जमीन/मौजे-ढंढाणे /ग.60-3/न.श.जु.रूपा./कावि/352/2026 दिनांक 02/06/2026 लगत मा तहसिलदार सो नंदुरबार यांचे कडीलपत्र क्रमांक /2026/जमीन-1/न.श.ज.रूपांतरण/कावि/1918/2026 दिनांक 15/10/2026 अन्वये मौजे ढंढाणे शिवारातील शेतजमीन गट नं 63/3 क्षेत्र 1.96 हे आर , पो.ख.-0.08 हे आर आकार रु 2.04 पैसे हि नवीन शर्तीची धारण केलेली भोगवटदार वर्ग-2 ची शेतजमीन कृषिक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण रुपांतरीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nसह दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील पत्रात नमूद केलेप्रमाणे विषयांकित भूखंडाचे मुल्यांकन र रु 13,27000/- , इतके कळविले आहे.\nत्यानुसार विषयांकीत भूखंडाच्या मूल्यांकनाच्या 25 % रूपांतरण अधिमुल्य आकारून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेस मंजुरी दिलेली आहे.\nअर्जदार यांनी विषयांकित भूखंडाच्या मुल्यांकनाच्या 25% र रु 1 रक्कम – 3,32000/- इतके - दि 30/03/2026 रोजी बँकेत चलनाद्वारे सरकार जमा केल्याचे चलन या कार्यालयास सदर केले आहे.\nअटी व शर्ती\n1. विषयांकित जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण झाल्यावर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा व तुकडेबंदी तुकडेजोड कायदा 1947 मधील तरतुदींचा भंग होणार नाही. सदर जमीन पडीत न ठेवता कृषिक प्रयोजनासाठी वापर करावा.\n2. खातेदार जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनासाठीच करावा.\n3. नागरी जमीन कमाल मर्यादा धारणाविनियम )अधिनियम 1976 (महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे शेतजमीन कब्जेदार सदरी यांना बंधनकारक राहिल.\n4. विषयांकित जमिनीच्या अधिमुल्याबाबत अथवा आकारणी यात लेखापरीक्षण रकमेत तफावत आढळून आल्यास त्यानुसार येणारी फरकाची रक्कम जमीन मालक यांना भरणे बंधनकारक राहिल. सदर रक्कम न भरल्यास जमीन नियमानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल.शासकीय वसुलीची रक्कम न भरल्यास नियमानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल.यास अधिन राहून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण परवानगी दिली आहे.\n5. सबंधित तलाठी यांनी आदेशातील शेतजमिनीच्या गटाच्या ७/१२ उताऱ्यावर भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग -1 मध्ये रूपांतरण अशी नोंद घेण्यात यावी.\n6. अर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले कागदपत्र सत्य आहेत असे गृहीत धरून नविन अविभाज्य शरतीने धारण केलेली शेतजमीन भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्यास परवानगी कामी मंजुरी देण्यात येत आहे. भविष्यात यात कोणतेही असत्यता आढळल्यास किंवा मालकी हक्काबाबत विवाद निर्माण झाल्यास ती निराकरण करण्याची जबाबदारी अस्तित्वात असलेल्या जमीन मालक यांची राहील.\n7. आदर आदेश अर्जदाराने प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्गमित केलेले आहे, त्यामुळे विषयांकित प्रकरणी अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, नमूद माहिती स्वाक्ष-या /अंगठे हि बाब वस्तुथितीशी विसंगत , माहिती दडवणारी , असत्य, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढल्यास सदरचा आदेश तात्काळ रद्द समजण्यात येईल.\n8. सदर आदेशातील प्रचलित शासन नियमांचा व कबुलायतीतील कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्यास जमीन सरकार जमा करण्यास पात्र राहिल .",
  "talathi": "डी.टी. खंदारे"
}
