{
  "village_code": "270200030014070000",
  "village_name": "मोहगाव",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:13:42Z",
  "surveys": [
    "40/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nअधिकारी - म. जिल्हाधिकारी सो. धुळे\nआदेश - क्र. फ/ कक्ष- 7/ टेनन्सी / आदि./ एस.आर/ 41/ 2026 दिनांक -29/5/2026\nसंदर्भ - 1 म. जिल्हाधिकारी सो. धुळे आदेश - क्र. फ/ कक्ष- 7/ टेनन्सी / आदि./ एस.आर/ 41/ 2026 दिनांक -29/5/2026\n2. अपर तहसील कार्यालय पिंपळनेर कडील पत्र क्र. /कु.का/ कावी/ 248/ 2026 दिनांक 25/6/2025\nअर्जदार श्री. सोनु सुमेरा कोकणी रा. मोहगांव ता. साक्री जि.धुळे या आदिवासी जमीन धारकांचे ताबे उपभोगातील मौजे मोहगाव ता. साक्री जि. धुळे येथील गट नं. 40/1/1 (खाते क्र. 423) क्षेत्र 0 हे 83 आर पो.ख. 0 हे 25 आर आकार रु. 0.33 पैसे पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 1 हे 07 आर ही आदिवासीने धारण केलेल्या नविन शर्तीच्या शेतजमीनीस भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करुन श्री. निलेश मधुकर ठाकरे रा. शेंदवड ता. साक्री जि.धुळे या आदिवासी धारकास कृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणे बाबत अर्ज जिल्हाधिकारी कार्यलय धुळे येथे सादर केला आहे.\nजमीन धारक अर्जदार सोयीची शेतजमीन घेण्यासाठी व आर्थिक अडचण भागविण्यासाठी सदर जमीन विक्री करीत आहेत. तसेच सदर शेत जमीन अनुसूचीत जमातीच्या खातेदाराकडून दुस-या अनुसूचीत जमातीच्या खातेदाराकडे कृषिक प्रयोजनार्थ हस्तांतरीत होणार असून प्रस्तुत क्षेत्राबाबत कोणताही दावा न्यायप्रविष्ठ नाही. तसेच सदर व्यवहारास सर्व हित सबंधितांची संमती आहे. जमीन खरेदीदार हे शेतकरी कुटुंबातील असलेबाबत त्यांचे सामाईक नावे मौजे मोहगाव ता. साक्री जि. धुळे येथील गट नं. 20/2/3 या शेतजमीनीचा 7/12 उतारा सादर केला आहे.\nविषयांकित जमिनीचे उक्त क्षेत्राकरिता एकूण मुल्यांकन र रु. 418608/- असून अर्जदार यांनी एकूण मुल्यांकनच्या 25% भरावयाचा नजराणा रु. 1,04,652/- भरले आहे. पुढील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली असे.\nअटी व शर्ती :-\n1. विक्री नंतर खरेदीदार हे उक्त जमीन भोगवटादार वर्ग -1 (जुनी शर्त) म्हणून धारण करतील.\n2. याकामी जमिनीचा प्रत्यक्ष व्यवहार नोंदविला जाईल तेव्हाची जमीनीची किंमत काढून 25% रक्कम वसूल केलेल्या तात्पुरत्या नजराण्याच्या रक्कमेपेक्षा जास्त होत असेल तर फरकाची रक्कम ही जमीन मालकाकडून वसूल करून सरकार जमा करणेस पात्र राहील.\n3. सदर जमीनीचा वापर कृषीक प्रयोजनासाठी करावा. अन्य प्रयोजनार्थ वापर करण्यापूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार सक्षम अधिका-यांची योग्य ती पूर्व परवानगी घ्यावी.\n4. खरेदीदार उक्त जमीन धारण केल्या नंतर म. जिल्हाधिकारी यांचे पुर्वपरवानगी शिवाय हस्तांतर करणार नाही व अशा प्रकारची परवानगी देणे किंवा नाकारणे हे त्यांचे अधिकारात राहील.\n5. प्रस्तृत जमीनीच्या 7/12 उता-यावर इतर हक्कामध्ये बोजे असल्यास, खरेदी विक्रीचा व्यवहार करणे पूर्वी मालकी हक्काबाबतची खात्री व जमीन निर्बोज करण्याचे शर्तीवर परवानगी देणेत येत आहे.\n6. विषयांकित जमीनीच्या हस्तांतरणा संदर्भात भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदार व अर्जदार यांची राहील. तसेच भविष्यात सदर जमीनीची किंमत / नजराणा मालकीहक्क इ. बाबत वाद उद्भवल्यास निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी जमीन धारकाची राहील.\n7. खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदीचा व शासन महसूल व वनविभागातील ठराव क्रमांक एलएनडी/1083/27925/ सीआर/ 3671/ग-6 दि. 8/09/1983 तसेच म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 36व 36 (अ ) मधील तरतुदींचा भंग झाल्यास जमीनधारक नियमानुसार पुढील कार्यवाहीस पात्र राहील.\n8. विषयांकित जमिनीच्या अधिमुल्यांबाबत अथवा आकारणी यांत लेखापरीक्षण रकमेत तफावत आढळुन आल्यास त्यानुसार येणारी फरकाची रक्कम जमीन मालक यांना भरणे बंधनकारक राहील. सदर रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणुन बोजाची नोंद अभिलेखात घेण्यात येईल. शासकिय वसुलीची रक्कम न भरल्यास नियमानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. यास अधिन राहून सदर जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करुन विक्री करणेस परवानगी दिली आहे.\n9. सदर जमीनीचे हस्तांतरणानंतर देखील इतर हक्की \"महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चेकलम 36 व 36 (अ) अन्वये हस्तांतरणास बंदी\" हा शेरा कायम राहील.\n10. सदरची परवानगी प्रस्तावातील सर्व कागदपत्र सत्य आहेत हे गृहीत धरुन देण्यात येत आहे. तथापि त्यात कोणत्याही वेळी असत्यता आढळल्यास किंवा वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास सदर परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल व होणारे नुकसानीस अर्जदार व जमीन धारक जबाबदार राहतील.\n11. प्रस्तुत शेतजमिनीचे सन 2025-26 (सन 2026-27 साठी लागू) साठीचे कृषिक प्रयोजनार्थ मुल्यांकन रक्कम रुपये 4,18,608/- इतके येत आहे. मात्र सौदापावतीनुसार सदर जमिनीची किंमत रक्कम रुपये 3,00,000/- इतकी ठरविण्यात आली आहे. मुल्यांकनाची रक्कम व सौदापावतीची रक्कम यापैकी मुल्यांकनाची रक्कम जास्त असल्याने मुल्यांकनाची रक्कम रुपये 4,18,608/- ही जमिनीची किंमत निश्चित करण्यात आली असल्याने जमीन धारक यांना मुल्यांकनानुसार संपूर्ण रक्कम अदा होईल याची खात्री अपर तहसिलदार, पिंपळनेर व दुय्यम निबंधक (वर्ग-2) साक्री यांनी करावी व त्यानंतरच गाव दप्तरी सदरच्या फेरफाराची नोंद घेण्यात यावी.\n12 वरीलपैकी कोणत्याही अटीचा / शर्तीचा भंग झाल्यास जमीन सरकार जमा करण्यास पात्र राहील.\n(वरीलसंदर्भीय आदेश दफ्तरी दाखल असे.)",
  "talathi": "मगन सोनू बहिरम"
}
