{
  "village_code": "270200040015150000",
  "village_name": "फागणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:51:47Z",
  "surveys": [
    "371/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे फागणे येथील शेती गट नं. ३७१/४, एकूण क्षेत्र ३ हेक्टर ९९ आर (लागवड क्षेत्र ०३ हे. ९८ आर + पो.ख. ०० हे. ०१ आर, आकार १८.६६ रु.पै.) ही मिळकत मूळ खातेदार श्री. घनश्याम विष्णू पाटील यांच्या मालकी व कब्जा वहिवाटीतील असून, त्यांनी व त्यांची पत्नी सौ. मायाबाई घनश्याम पाटील यांनी दाखल केलेल्या दिनांक १७/१०/२०२६ रोजीच्या नोटराईज्ड कौटुंबिक वाटणी/व्यवस्थापत्र (नोंदणी क्र. ३६५/२०२६) तसेच उभयतांचा प्रत्यक्ष जबाब व मुलांची (योगराज घनश्याम पाटील व मेघा घनश्याम पाटील) संमती विचारात घेऊन, गट नं. ३७१/४ चे खालीलप्रमाणे वाटप व वहिवाटीची नोंद नोंदवण्यात येत आहे:\n१. सौ. मायाबाई घनश्याम पाटील:\nक्षेत्र: उत्तर भाग — एकूण क्षेत्र ०२ हेक्टर ०७ आर (ला.क्षे. ०२ हे. ०७ आर, पो.ख. ००)\nचतु:सीमा: पूर्वेस - गोपिचंद विष्णू यांचे शेत; पश्चिमेस - बाभुळवाडी रोड; दक्षिणेस - याच शेताचा उर्वरित भाग (घनश्याम विष्णू पाटील यांचे क्षेत्र); उत्तरेस - गुलाब विष्णू यांचे शेत.\n२. श्री. घनश्याम विष्णू पाटील:\nक्षेत्र: दक्षिण भाग — एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ९२ आर (ला.क्षे. ०१ हे. ९१ आर, पो.ख. ०० हे. ०१ आर)\nचतु:सीमा: पूर्वेस - गोपिचंद विष्णू यांचे शेत; पश्चिमेस - बाभुळवाडी रोड; दक्षिणेस - रस्ता; उत्तरेस - याच शेताचा उर्वरित भाग (मायाबाई घनश्याम पाटील यांचे क्षेत्र).\nवहिवाट व पाणी हक्क विशेष नोंद:\n१. रस्ता व वहिवाट हक्क: सदर शेतजमिनीसाठी पश्चिमेकडील बाभुळवाडी रोड व दक्षिणेकडील रस्त्यावरून वहिवाटीचा रस्ता उभयतांना परस्परांच्या हिश्श्यास बाधा न पोहोचवता कायमस्वरूपी वहिवाटीप्रमाणे चालू राहील.\n२. विहीर व पाणी वापर हक्क: शेती गट नं. ३७१/१/२/३ मध्ये असलेल्या सामाईक पक्की विहिरीवरून गट नं. ३७१/४ मधील वरील दोन्ही वाटपधारकांना (श्री. घनश्याम विष्णू पाटील व सौ. मायाबाई घनश्याम पाटील) विहिरीचा वापर व कायमस्वरूपी पाणी घेण्याचा समान वहिवाट हक्क व अधिकार अबाधित राहील.\nसबब, सदर वाटणीपत्राप्रमाणे ७/१२ व ८-अ खात्यावर स्वतंत्र/सामाईक नोंदीस वरील वहिवाट व पाणी हक्काच्या शर्तींसह फेरफार नोंद घेतली.\n(अर्ज, वर्दी व नोटरी वरून )",
  "talathi": "एहतेशाम हुसनोद्दीन शेख"
}
