{
  "village_code": "270300090023350000",
  "village_name": "चांदसर बुद्रुक",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:31:36Z",
  "surveys": [
    "194/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे चांदसर, ता. धरणगांव येथील गट नं. 194/1 क्षेत्र 0.72 हे. आर, आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर. आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब ची शेतजमीन असून, सदर जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करून मिळणेबाबत श्रीमती. सुमन भागवत बारी, रा. चांदसर बु. ता. धरणगांव, जि. जळगांव यांनी अर्ज सादर होता\nत्यानुसार मंडळ अधिकारी, चांदसर भाग यांनी चौकशी करून दिनांक 10/10/2025 रोजी अहवाल सादर केलेला असून, सदर अहवालानुसार प्रस्तुत प्रकरणी गट नं. 194/1 क्षेत्र 0.72 हे. आर, आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर, आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब चा असल्याचे स्पष्ट होते.\nत्यानुसार मुंबई हलके गाव नोकर इनाम नष्ट करणे कायदा, 1958 नुसार दिनांक 01/02/1962 पासून सर्व इनाम खालसा करण्यात आलेली असून नोंद क्र. 3375 दिनांक 07/01/66 अन्वये सदर जमीन रीग्रांट करण्यात आलेली आहे.\nत्यानुसार शासन परिपत्रक क्र. वतन-1099/प्र.क्र.223/ल-4, दिनांक 9 जुलै 2002 मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग-2 मधील कोळी इनाम वर्ग 6-ब जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नजराणा भरणे आवश्यक आहे. त्याअर्थी दुय्यम निबंधक, धरणगांव यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2025 नुसार गट नं. 194/1 सदर जमिनीचा शीघ्रसिद्धगणकानुसार नजराण्याचा मूल्यांकन दर रु. 504252/- ठरविण्यात आलेला आहे तसेच गट नं. 194/2 सदर जमिनीचा शीघ्रसिद्धगणकानुसार नजराण्याचा मूल्यांकन दर रु. 252126/- ठरविण्यात आलेला आहे त्याच्या 50% प्रमाणे रु. गट नं. 194/1- र.रु 252126 + गट नं. 194/2- र.रु. 126063 इतकी रक्कम नजराणा म्हणून चलन दिनांक 27/11/2025 रोजी 1. चलन क्र. MH012429104202526M /2. MH012428727202526M अन्वये भारतीय स्टेट बँक, शाखा धरणगांव येथे भरणा करण्यात आलेला आहे.\nम. तहसिलदार धरणगांव या आदेशान्वये मौजे चांदसर बु., ता. धरणगांव येथील गट नं. 194/1 क्षेत्र 0. 72 हे. आर. आकार रु. 5.13 पैसे व गट नंबर 194/2 क्षेत्र 0.36 हे. आर, आकार रु. 2.46 पैसे ही पाटील इनाम वर्ग 6-ब ची जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यास खालील अटी व शर्तीवर मंजुरी देण्यातआलेली आहे.\nअटी व शर्ती\n1. भविष्यात हक्काभिलेखासंदर्भात काही वाद उद्भवल्यास त्या वादासंबंधीची संपूर्ण जबाबदारी जमीनधारकाची राहील.\n2. सदर विक्रीचा व्यवहार खालील कायद्यांच्या तरतुदींनुसार व त्यांचे अधिन राहून करण्यात यावा.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961.\nब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948.\nक) मुंबईचा तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा, 1947.\nड) सदर जमिनीस लागू असलेल्या इतर सर्व प्रचलित कायद्यांतील तरतुदी.\n3. प्रकरणी दिनांक 9 जुलै 2002 चे परिपत्रकात नमुद केलेप्रमाणे संपूर्ण क्षेत्राबाबत भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 करण्याबाबत तरतुद आहे. त्याअनुषंगाने अर्जदार यांना फक्त शेती उपयोगाकरिता\nअर्जदार यांना परवानगी देण्यात येत आहे.\nवरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास / केल्यास अगर प्रस्तावातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास सदरचा आदेश आपोआप रद्द होऊन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता जमीन सरकार जमा केली जाईल. वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास किंवा प्रस्तावातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास, सदरचा आदेश आपोआप रद्द ठरेल व कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई न देता सदर जमीन शासनजमा करण्यात येईल.\nसदरची नोंद म. तहसिलदार धरणगांव याचाकडील आदेशावरून केली असे.",
  "talathi": "संदेशकुमार अमृत आखाडे"
}
