{
  "village_code": "270300110025750000",
  "village_name": "वंजारी खूर्द",
  "taluka_name": "पारोळा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5085,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:43Z",
  "surveys": [
    "93/1/अ",
    "93/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन-3/एस.आर./156/2024\nआदेश दिनांक : 20/04/2026 अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन-3/एस.आर./156/2024\nआदेश दिनांक : 20/04/2026 सुरेश सोनु चौधरी रा. वंजारी खुर्द यांनी मोजे वंजारी खुर्द ता. पारोळा येथील गट नं. 93/1/अ व 93/1/क च्या 7/12 उताऱ्यातील इतर अधिकारात \"किसन रामसिंग गहान व रामलाल गोधा ता. ग. दे..\" हा कालबाह्य शेरा कमी करुन मिळणेबाबत इकडील कार्यालयात दिनांक 25/06/2024 रोजी अर्ज सादर केलेला आहे.\nप्रस्तुत अर्जाची चौकशी मंडळ अधिकारी शेळावे भाग याचेमार्फत केलेनंतर चौकशी अहवाल क्र. मं.अ./कावि/475/2025 दिनांक 17/03/2025 च्या पत्रान्वये या कार्यालयात सादर केलेला आहे. सदर अहवालात मंडळ अधिकारी यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय सादर केलेला आहे.\n1. मोजे वंजारी खुर्द शिवारातील शेतजमीन गट नं. 93/1/अ व 93/1/क च्या इतर अधिकारातील \"किसन रामसिंग गहान व रामलाल गोधा ता.ग.दे.\". 768 अन्वये दाखल आहे. तसेच गट स्किम च्या नक्कल वर देखील हा बोजा दिसन येत आहे. सदरचा शेरा हा 50/60 वर्षापुर्वीचा पोकळीस्थ असल्याने कमी करुन मिळणे बाबतच्या अर्जावर चौकशी केली असता तसेच संचिकेत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता गदरचा शेरा हा सर्वे नं. 58/1 चे 7/12 उताऱ्यावर सन 1941-42 पासुन दिसुन येत आहे. सदर 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात लहानु शिवाजी ताबे गहाण देणार- तुकाराम व रामलाल गोधा ताबे गहाण घेणार ताबा नाही अनी नोंद दिसुन येते आहे. सदर नोंद हि सन 1941-42 ची दिसुन येत आहे. सदर बोज कमी करणे बाबत भविष्यात कोणताही स्वरुपाचा वाद झाल्यास त्याचे सर्व निवारण अर्जदार करुन घेईल तसेच सर्वस्वी जबाबदार राहिल याबाबत अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिलेले आहे.\nसदरचा बोजा साधारण 70 वर्षापुर्वीचा असल्याने कालमर्यादा अधिनियमातील तरतुदीचा बाधा येते तरी आपले स्तरावरुन प्रेसनोट देऊन हरकत प्राप्त न झाल्यास सदरचा बोजा कमी करण्यास काहि हरकत नसावी असे नम्र मत आहे. याबाबचा अहवाल मंडळ अधिकारी शेळावे यांनी दिलेला आहे. 2. प्रकरणी या कार्यालयाचे पत्र क्र. जमीन-3/एसआर/156/2025 दि. 17/06/2025 अन्वये ग्राम महसुल अधिकारी यांचे मार्फत मौजे वंजारी खुर्द ता. पारोळा येथी गट नं. 93/1/अ चे क्षेत्र 0.95 हे. आर. व गट नं. 93/1/क क्षेत्र 0.93 हे. आर च्या 7/12 उताऱ्याच्या इतर अधिकारात \"किसन रामसिंग गहान व रामलाल गोधा ता.ग.दे. \"नोंद क्र. 768 ने दाखल शेरा बाबत दवंडी देण्यात आलेली असुन दवंडी उताऱ्याची प्रत प्रकरणी सादर करण्यात आलेली आहे.\n3. प्रकरणी अर्जदार यांनी पारोळा भुषण या वर्तमान पत्रात दि. 19/07/2025 रोजी मौजे वंजारी खुर्द ता. पारोळा येथी गट नं. 93/1/अ व 93/1/क च्या 7/12 उताऱ्याच्या इतर अधिकारात \"किसन रामसिंग गहान व रापलाल गोधा ता.ग.दे.\" नोंद क्र. 768 ने दाखल शेरा बाबत जाहिरात देण्यात आलेली असुन सदर जाहिरात दिले बाबतची प्रत प्रकरणी सादर करण्यात आलेली आहे.\nमा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र. संकीर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्र. 22997/जा.क्र. 17085 दि. 06/08/2021 च्या पत्रात नमूद प्रमाणे संगणीकृत 7/12 मधील इतर हक्कातील कालबाहय नोंदी कमी करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. व त्यानुसार सदरील शेरा इतर हक्कातुन कमी करणे उचित ठरेल. त्यानुसार मी खालील आदेश पारीत करत आहे.\nआदेश:-\n1) मौजे वंजारी खुर्द ता. पारोळा येथील गट नं. 93/1/अ व 93/1/क चे इतर अधिकारात \"किसन रामसिंग गहान व रामलाल गोधा ता.ग.दे.\" हा कालबाह्य शेरा कमी करणेत यावा.\n2) सदरील आदेश हा अर्जदाराचे जाब-जबाब प्रकरणी दाखल कागदपत्रे यांच्यावरुन देण्यात येत आहे भविष्यात जर सदरील नोंद अथवा शेऱ्याबाबत काहिहि न्यायप्रविष्ट बाब उद्भवल्यास अथवा अर्जदाराने वस्तुस्थिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येईल.\n3) प्रस्तुत आदेशानुसार गावी हक्क पत्रकी दुरुस्त नोंद घेवून संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पुढील कार्यवाही नियमानुसार करावी.\nअसा वरीलप्रमाणे तहसील कार्यालय पारोळा यांच्या कडील आदेश क्रमांक- जमीन-3/एस.आर./156/2024 दिनांक: 20/04/2026 आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद केली असे .",
  "talathi": "पराग सुरेश पाटील"
}
