{
  "village_code": "270300130028340000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:02:52Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी जळगाव\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/3/सिलिंग/ईऑफिस क्र.3497434/एसआर/30/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nमौजे तळेगाव येथील नारायण विश्वासराव देशमुख व इतर रा.तळेगाव यानी गट नंबर 289 चे क्षेत्र 2.20 हे आर व पो.ख. क्षेत्र 0.23 हे आर एकूण क्षेत्र 2.43 हे आर आकार र रु. 2.75 पै. या नवीन अविभाज्य शर्ती ने धारण केलेल्या जमिनीस भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करण्यास म जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे कडील आदेशानुसार खालील शर्तीवर मंजुरी देण्यात येत आहे.याबाबत निर्गमित म अपर जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेशात खालील प्रमाणे अटी व शर्ती नमूद आहेत\nअटी व शर्ती\n1. जमीनधारक हे प्रश्नाधिन जमीन आदेशाच्या दिनाकांपासून भोगवटादार वर्ग-1 वर धारण करतील.\n2. उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\n3. भविष्यात सदर जमिनीचा विक्रीचा व्यवहार करावयाचा झाल्यास खालील कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून करण्यात यावा.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961.\nब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948\nक) मुंबईचा तुकडे प्रतिबंधक व जमीन एकत्रिकरण कायदा, 1947.\nड) सदर जमिनीस लागू असलेल्या संबंधित इतर प्रचलित कायद्यातील तरतुदींप्रमाणे अधीन राहून करण्यात यावा.\n4. भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यांस त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.\n5. प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम\nनिघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल.\n6. वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास / केल्यास अगर प्रस्तावातील कोणतीही माहिती/कागदपत्रे खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास सदरचा आदेश आपोआप रद्द होऊन कोणत्याही प्रकारची भरपाई न देता शेतजमीन शासन जमा केली जाईल.\nयाबाबत म जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र क्र.कुळका/3/सिलिंग/ईऑफिस क्र.3497434/एसआर/30/2026 03/11/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "बळीराम नामदेव काळे"
}
