{
  "village_code": "270300150030280000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:46Z",
  "surveys": [
    "399/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nअर्जदार श्री. प्रकाश उत्तम कोळी रा. रांजणी ता. जामनेर जि. जळगाव यांनी मोजे रांजणी ता.जामनेर येथील गट नं 399/1/अ क्षेत्र 1.17 हे. आर आकार 3.88 रु.पै.या नवीन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या शेतजमीनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-2 मधून जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेकामी परवानगी मिळणेस विनंती केलेवरुन म. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेशावरुन नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या शेतजमीनीस \"कृषिक प्रयोजनार्थ\" भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतर करणेस खालील शर्तीवर मंजूरी देण्यात येत आहे.\nअटी व शर्ती :-\n1. जमीनधारक हे प्रश्नाचिन जमीन आदेशाच्या दिनाकांपासून भोगवटादार वर्ग-1 वर धारण करतील.\n2. उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\n3. भविष्यात जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961मधील तरतुदींचा व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड लगत 3 परीपत्रक क्रमांक 2 शासन ठराव क्रमांक एल एन डी 1083/27925/सीआर/3671/ग 6 दिनांक 08 सप्टेबर 1983 मधील तरतुदींचा भंग होऊ नये.\n4. भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यांस त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.\n5. अर्जदाराने अनर्जित उत्पन्नची रक्कम तसेच शासनास देय असलेल्या इतर रकमांचा भरणा केलेला असल्याने खरेदीदारांच्या नावे कबुलायत करण्यात यावी.\n6.प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करण्यात आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास सदरची फरकाची रक्कम भरणा करणे जमीनधारकास बंधनकारक राहील.\n7.प्रस्तुत परवानगी उपवनसंरक्षक वनविभाग जळगाव यांच्या उपोतघातातील पत्राच्या आधारे देण्यात येत आहे. सदर पत्रातील नमूद तपशील व त्यातील अटी व शर्ती प्रकरणी बंधनकारक राहतील.\n8. जमिनीचे मिळकतदार यांनी जमिनीचा उपयोग फक्त कृषी प्रयोजनासाठी करावा त्याचा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी उपयोग करावयाचा झाल्यास सक्षम अधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल तसेच अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार एनर्जीत उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करावी लागेल.\n9. सदरची परवानगी सहाय्यक संचालक नगर रचना जळगाव यांचे कडील दिनांक 15/7/2025 रोजीचे झोन दाखल्यानुसार उक्त मिळकत ही ना विकास विभागात स्थित असल्याचे नमूद असल्याने त्यानुसार देण्यात आलेली आहे.\n10. जमिनीचे मिळकतदार यांना बिनशेती वापर कराव्याचा झाल्यास संभाव्य बिनशेती बिनशेतीची मूल्यांकनाची अनर्जित उत्पन्नाची रक्कम भरणे आवश्यक राहील.\n11. प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग दोन मधून वर्ग एक मधील धारणाधिकारातील रूपांतर शासनाकडील असाधारण क्रमांक 85 मधील दिनांक 04/03/2025 रोजीच्या अधिसूचनेच्या अधीन राहून देण्यात येत आहे. प्रश्नाधीन जमिनी बाबत भविष्यात शासन ठरविल ते प्रचलित धोरण जमीनधारकास बंधनकारक राहील तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल दप्तरी नोंदवलेस पात्र राहील.\n12. सदर आदेशातील तसेच कबुलायतेतील अटी व शर्तींचा भंग झाल्यास जमीन सरकार दाखल करण्यास पात्र राहील.\n13 अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी /बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.",
  "talathi": "प्रविण रमेश शिंपी"
}
