{
  "village_code": "270600030058530000",
  "village_name": "कामठा",
  "taluka_name": "कारंजा(लाड)",
  "district_name": "वाशिम",
  "mut_no": 490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-14",
  "objection_until": "2026-05-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:55:48Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/05/2026\nअधिकारी :मा.सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य,पुणे\nआदेश क्रमांक : पुनरीक्षण अर्ज क्र.84/2025\nआदेश दिनांक : 14/01/2026\nमा. सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे नुसार मौजे कामठा ता. कारंजा जि. वाशीम येथील स.नं./ग.नं. 29 क्षेत्र ०.८३ हे आर जमीन मोहम्मद सिद्दिकी दाउदभाई पुंजानी रा.कारंजा जि वाशीम यांनी दस्त क्र.१२५२/२००२ दि ०८/०४/२००२ नुसार खरेदी घेतली असून या खरेदी विरोधात सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचे कार्यालयात खरेदी देणार मारोती दमडुजी बिल्लेवार रा कामठा ता कारंजा यांनी अपील दाखल केल्यावरून मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांनी सदर खरेदी खत दि १८/०३/२०१७ रोजी अवैध घोषित केले. त्याविरोधात खरेदी घेणार मोहम्मद सिद्दिकी दाउदभाई पुंजानी रा.कारंजा यांनी विभागीय सहनिबंधक, सावकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचे समोर अपील क्र २३/२०१७ दाखल केले त्यामध्ये विभागीय सहनिबंधक, सावकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी मोहम्मद सिद्दिकी दाउदभाई पुंजानी यांचे अपील दि ७/११/२०१७ रोजी खारीज केले. व नंतर मोहम्मद सिद्दिकी दाउदभाई पुंजानी (मयत) तर्फे त्यांचे कायदेशीर वारस मरयम मो.सिद्दिकी पुंजानी व इतर चार यांनी सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे न्यायलयात दाखल केलेला पुनरीक्षण अर्ज क्र.84/२०२५ आदेश पारित दि १४/०१/२०२६ नुसार सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ९ अन्वये मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचा दि.१८/०३/२०१७ व विभागीय सहनिबंधक, सावकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचा दि ७/११/२०१७ चे आदेश रद्द केल्यामुळे खरेदी घेणार मोहम्मद सिद्दिकी दाउदभाई पुंजानी यांचे नाव गाव नमुना 7 अधिकार अभिलेख मध्ये नोंदविण्यात येत आहे.",
  "talathi": "तन्मय रविंद्र जटाळे"
}
