{
  "village_code": "270700070073960000",
  "village_name": "भांडोली",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:55:34Z",
  "surveys": [
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\n*बोअरवेलच्या पाण्याचा भागीदारीचा लेख*\n*एकुण लागलेला खर्च रक्कम रुपये ७५,०००/- (पंच्याहत्तर हजार रुपये फक्त)*\n* *पार्टी नं. १:* शोभा संतोष कुकडे\n* *पार्टी नं. २:* चंद्रकला बकारामजी झाडोदे\nखालीलप्रमाणे पा. नं. १ व २ यांनी आपसांतील बोअरवेल मधील पाण्याचा भागीदारीचा लेख लिहून देत आहेत, ते येणेप्रमाणे:\nपा. नं. २ यांनी मौजा भांडोली येथील शेत मालक पा. नं. १ शोभा संतोष कुकडे, यांचे शेत मौजा भांडोली भु. क्र. २९१ हे.आर. १.५४ पो.ख. ०.०८ आ. रु. ९.५७ पैकी पार्टी नं. १ यांचे मालकीचे शेत हे.आर. ०.८६ व पो.ख. ०.०८ यांचे शेताचे मध्यभागी स्थित पार्टी नं. २ यांनी पार्टी नं. १ यांच्या शेतात प्रत्येकी निम्मे खर्चाने सन २००३ पूर्वी बोअरवेल तयार केला होता. तसेच त्या बोअरवेलच्या पाण्याची गरज न पडल्यामुळे त्या बोअरवेलचा उपयोग उभय पक्षांनी यापूर्वी घेतलेला नाही. परंतु भविष्यामध्ये त्या बोअरवेलच्या पाण्याची उभयतांना गरज पडु शकत असल्यामुळे त्याचे पाणी वाटपाचा ठराव आपण उभयतांनी खालीलप्रमाणे संमत करुन ठेवलेला आहे. त्यानुसार पाणी वाटपाच्या अटी व नियम खालीलप्रमाणे आहेत:\n१) वर वर्णन केलेल्या शेतातील बोअरवेलमध्ये १ मोटरपंप बसविण्याकरिता लागणारा सर्व खर्च पार्टी नं. १ व २ यांनी आपआपल्या पाणी वाटपाच्या हिश्याप्रमाणे केला असून त्या १ मोटरपंपावरुन पाणी वाटण्यासंबंधी आपण खालीलप्रमाणे अटी व नियम ठरवून आपसात वाटून घेण्याचे ठरविले. तसेच आपले आपसात ठरल्यानुसार पाणी वाटपाचा आठवडा हा ९ दिवस रात्रीचा राहील. पैकी पार्टी नं. १ चा ९ दिवस रात्रीच्या पाळीपैकी ५ दिवस रात्रीचा हक्क राहील. यानुसार पाळीप्रमाणे ओलीत करण्याचा हक्कासह. तसेच पार्टी नं. २ यांचा ९ दिवस रात्रीच्या पाळीपैकी ४ दिवस रात्रीचा हक्क राहील.\n२) तसेच पा. नं. १ व २ यांनी वर वर्णन केलेल्या बोअरवेलमधील पाण्याचा वाटप वरप्रमाणे दर्शविण्यात आलेला असून यापुढे त्यानुसार पाण्याचा वाटप कायम राहील. त्यास पार्टी नं. १ व २ चा कोणत्याही प्रकारचा आक्षेप राहणार नाही.\n३)वर वर्णन केलेल्या शेतातील बोअरवेलमधील पाणी कमी झाल्यास अगर पाण्याकरीता लेवल करणे झाल्यास इतर लागणारा सर्व खर्च हा पां. नं. १ व २ यांनी करावा लागेल व या सर्व साहीत्यावर पा. नं. १ व २ यांचा समान हक्क राहील.\n४) तसेच त्या बोअरवेल वरील ओलीताकरीता इले. विद्युत पुरवठा हा पा. नं. १ यांचे नावांने घेण्यास पा. नं. २ यांची संमती आहे. त्यावर पार्टी नं. १ व २ यांचा समान हक्क राहील.\n५) तसेच पा.नं. १ व २ यांचे हिस्याचे पाणी ओलीताशिवाय शिल्लक राहल्यास ते पाणी पा. नं. १ व २ यांना इतर कोणास देण्यास अगर विकण्यास हक्क अधिकार राहील.\n६) बोअरवेल चालु बंद करण्याकरीता परीसरात जाण्यायेण्याकरीता पायवाट ही मुळ मालक यांनी दिल्या प्रमाणे नेहमीकरीता मोकळी आहे व राहील. त्याच प्रमाणे वहीवाट करण्याचे हक्कासह.\n७) नैसर्गीक आपत्तीमुळे इले. मो. पंपात बिघाड झाल्यास ती चालु व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पा.नं. १ व २ यांची हिश्या प्रमाणे राहील. त्याचा येणारा खर्च पा. नं. १ व २ यांनी करावा.\n८) येणेप्रमाणे पाण्याची समस्या लक्षात घेवुन वरील भागीदारीचा लेख आपण आपले उभयंतांचे ठरल्याप्रमाणे आपण वाचुन, समजुन घेवुन स्वईच्छेने व राजीखुशीने लिहून ठेवला आहे.\n९) पा. नं. २ यांनी स्वखर्चाने अंडर ग्राऊंड पाईप लाईन टाकुन स्वतःचे शेतात वरील बोअरवेल वरुन पाणि घेऊन जाऊन स्वतःचे शेत ओलीत करावे.\nसदरहू भागीदारीचा लेख हा फक्त शेतातील बोअरवेलमधील पाण्याचे वापराबाबत असुन त्याने कोणत्याही प्रकारे जमिनीचे हस्तांतरण होणार नाही. संपूर्ण जमिन ही पा. नं. १ यांचे मालकीची राहील.\nयेणेप्रमाणे हा भागीदाराचा लेख शेतातील बोअरवेलमधील पाण्याचे वापराबाबत आज रोजी लिहून ठेवला आहे, त्यामुळे याची पटवारी अभिलेखात आपण एकमेकांनी, एकमेकांचे नावावर नोंद करुण घ्यावी व द्यावी आणि पाण्याची पाहीजे त्याप्रमाणे वहिवाट करुन उपभोग घ्यावा.\nवरुन हा भागीदारीचा लेख आपले ठरल्याप्रमाणे आज रोजी वरुड मुक्कामी खालील सह्या करणारे साक्षदारांसमक्ष त्यावर आपण आपल्या रितसर सह्या करुन लिहून ठेवलेला आहे. तो आपले मालमत्तेस व इस्टेट वारसांस लागु असुन बंधनकारक राहील.\nवरील बोअरवेल हक्क लेख हा दुय्यम निबंधक वरुड यांचे दस्त क्र ११८५ दस्त दिनांक ११/०३/२०२६ नुसार घेण्यात आला.दस्त दफ्तरी असे.",
  "talathi": "सोनाली दिवाकर चौधरी"
}
