{
  "village_code": "271000030119160000",
  "village_name": "बेला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 17248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:26Z",
  "surveys": [
    "307",
    "310/6/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nमौजा बेला व तालुका भंडारा येथील ७/१२ उताऱ्यातील भूमापन क्रमांक ३०७ (खाते क्र. 1006159) व ३१०/६/३ (खाते क्र. 1006158) मधील सामायिक खातेदार श्री. रामदास दाजीबा महाकाळकर (रा. गुरुनानक वार्ड, शास्त्रीनगर, भंडारा) यांचा मृत्यू दिनांक २१/०१/२०२४ रोजी झालेला आहे (मृत्यू दाखला नोंदणी क्र. D-2024: 27-90074-000109, नोंदणी दिनांक २४/०१/२०२४). मयत श्री. रामदास दाजीबा महाकाळकर यांनी त्यांच्या हयातीत दिनांक २०/०८/२०२३ रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर निष्पादित केलेल्या मृत्युपत्र/इच्छापत्रामधील तरतुदीनुसार, त्यांनी आपल्या मालकीची व सामायिक हक्काची संपूर्ण मालमत्ता व सर्व अधिकार केवळ आणि केवळ त्यांची पत्नी सौ. इंदिरा रामदास महाकाळकर यांनाच प्रदान केलेले आहेत. त्याअनुषंगाने, भूमापन क्रमांक ३०७ व ३१०/६/३ वरील सामायिक खातेदारांच्या यादीतून मयत श्री. रामदास दाजीबा महाकाळकर यांचे नाव कमी करून, त्यांनी निष्पादित केलेल्या मृत्युपत्र दिनांक २०/०८/२०२३ अन्वये त्यांच्या जागी एकमेव भोगवटादार म्हणून त्यांच्या पत्नी सौ. इंदिरा रामदास महाकाळकर (रा. भंडारा) यांचे नाव प्रविष्ट करण्यासाठी ही फेरफार नोंद घेतली.",
  "talathi": "राजेश मारोतराव ठाकरे"
}
