{
  "village_code": "271100030128210000",
  "village_name": "मोरवाही - 34",
  "taluka_name": "गोंदिया",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:35:51Z",
  "surveys": [
    "66",
    "884",
    "885",
    "886"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nजिल्हा : गोंदिया\nतालुका : गोंदिया\nमौजा : मोरवाही\nखाता क्र. : 264\nगट क्र. : 884, 66, 885, 886, 927\nफेरफाराचा प्रकार :\nदुरुस्ती फेरफार – मयत खातेदाराचे नाव वारस फेरफार न घेता नजरचुकीने कमी झाल्याबाबत.\nफेरफार मजकूर :\nमौजा मोरवाही, ता. गोंदिया, जि. गोंदिया येथील खाता क्र. 264 मधील गट क्र. 884, 66, 885, 886 व 927 या जमिनींच्या अभिलेखात खातेदार श्रीमती उर्मिला जगन्नाथ फुंडे यांचे नाव नोंदविलेले होते.\nसदर खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद घेण्यासाठी वारस फेरफार घेणे आवश्यक असताना, नजरचुकीने वारस फेरफार न घेता मयत खातेदार श्रीमती उर्मिला जगन्नाथ फुंडे यांचे नाव कमी करण्याचा फेरफार घेण्यात आलेला आहे.\nत्यामुळे सदर पूर्वीच्या फेरफाराची दुरुस्ती करून, मयत खातेदाराचे नाव कमी केल्याची नोंद दुरुस्त करण्यात यावी व त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद घेण्यासाठी नियमानुसार पुढील वारस फेरफार घेण्यात यावा.\nसदर दुरुस्ती फेरफार मंजूर करण्यासाठी सादर.",
  "talathi": "धिरजकुमार प्रेमलाल ताराम"
}
