{
  "village_code": "271500140202840000",
  "village_name": "उस्‍माननगर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4929,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:18:44Z",
  "surveys": [
    "772"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकोर्ट डिक्री नोंद:-\nउस्माननगर येथील खातेदार इंदुबाई बुद्धाजी घोरबांड यांनी अर्ज व कोर्ट डिक्रीची नकल सादर केल्यानुसार मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कंधार यांचेकडील दिवाणी दावा आर.सी.एस.नं. 127/2026 व त्यामधील तडजोडपत्र निकाल दिनांक 12/09/2026 नुसार वादी (1) व्यंकटी बुद्धाजी घोरबांड, (2) इंदुबाई बुद्धाजी घोरबांड विरुद्ध प्रतिवादी (1) गंगासागर संभाजी घोरबांड (2) बुद्धाजी संभाजी घोरबांड (3) गोविंदा संभाजी घोरबांड (4) आनंदा संभाजी घोरबांड (5) श्रीराम संभाजी घोरबांड (6) हिराबाई दत्ताराम खोसडे (7) शोभाबाई व्यंकोबा भवर यांच्यामधे तडजोड होऊन पुढीलप्रमाणे हिस्सेवाटप झाल्याचे नमूद आहे.\nउस्माननगर येथील गट क्र. 772 मधील प्रतिवादी क्र. (2) बुद्धाजी संभाजी घोरबांड यांच्या नावे असलेल्या 2.66 हे.आर. पैकी 1.66 हे.आर. व प्रतिवादी क्र. (4) आनंदा संभाजी घोरबांड यांच्या नावे असलेल्या 1.84 हे.आर. पैकी 0.20 हे.आर. अशी एकूण 1.86 हे.आर. वादी क्र. (2) इंदुबाई बुद्धाजी घोरबांड यांच्या वाटणी हिश्यात देण्यात आली आहे.\nप्रतिवादी क्र. (2) बुद्धाजी संभाजी घोरबांड यांना ग.न. 772 मधील 2.66 हे.आर. पैकी वादी क्र. (2) इंदुबाई बुद्धाजी घोरबांड यांना वाटणी हिश्यात दिलेली 1.66 हे.आर. सोडून शिल्लक राहिलेली 1.00 हे.आर. शेतजमीन वाटणी हिश्यात देण्यात आली आहे.\nप्रतिवादी क्र. (4) आनंदा संभाजी घोरबांड यांना ग.न. 772 मधील त्यांच्या नावे असलेल्या 1.84 हे.आर. पैकी वादी क्र. (2) इंदुबाई बुद्धाजी घोरबांड यांना वाटणी हिश्यात दिलेली 0.20 हे.आर. सोडून शिल्लक राहिलेली 1.64 हे.आर. शेतजमीन वाटणी हिश्यात देण्यात आली आहे.\nप्रतिवादी क्र. (1) (3) व (5) त्यांच्या नावाने यापूर्वीच असलेली शेतजमीन त्यांच्याच वाटणी हिश्यात देण्यात आली आहे.वादी क्र. (1) तसेच प्रतिवादी क्र. (6) व (7) यांनी आपला हिस्सा विना मोबदला सोडून दिल्याचे नमूद केलेले आहे.करीता कोर्ट डिक्री नुसार नोंद घेऊन फेरफार पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कल्‍याण किशनराव हिवंत"
}
