{
  "village_code": "271800020223600000",
  "village_name": "माहोरा",
  "taluka_name": "जाफ्राबाद",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:00Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुरुस्ती फेर-\nमूळ जमीन मालक – कैलास आत्माराम कासोद व राजू दामोधर तायडे यांनी मौजे - माहोरा ता.जाफ्राबाद जि.जालना शिवारातील ग.नं.4 मधील 0 हे 12 आर शेत जमिनी खरेदी खत क्र.2804/2026 दि. 27/07/2026 नुसार – खरेदी खत लिहून घेणार – मंगला राजू तायडे रा. माहोरा ता.जाफ्राबाद जि. जालना यांना र.रु.1385000/ मध्ये विक्री केली आहे. सदरील खरेदीचा फेर हा फेर क्र.6901 ने ७/१२ वर अंमल झाला असून ऑंनलाईन ७/१२ मध्ये मंगला राजू तायडे यांच्या नावे 0.12 आर क्षेत्र दर्शवित आहे ,सदरील खरेदी खता नुसार इतर अधिकारातील जाण्या – येण्यासाठी असणारा रस्ता घेणार यांना माहोरा - जाफ्राबाद मेन रोड पासून ते शेवंताबाई किसन कासोद यांच्या जमिनीतून उत्तर-दक्षिण पूर्वेकडील बाजूने 15 फुटाचा रस्ता घेणार यांना या विक्री 0.12 आर जमिनीत जाण्या येण्यासाठी कायमस्वरूपी राहील.अशी नोंद बाकी असून तो त्यांनी सदरील दस्ता मध्ये लिहून दिला आहे. तरी खरेदी खत लिहून घेणार यांनी तलाठी कार्यालय माहोरा सदरील दस्ताची प्रत सादर केल्यावरून सदरील दुरुस्ती फेर घेण्यात आला,जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पांडुरंग नारायण काळवाघे"
}
