{
  "village_code": "271800050000000000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 15737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:30:00Z",
  "surveys": [
    "31/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे अंबड येथील सर्वे नं. 31/2 मधील क्षेत्रापैकी 0 हे. 36 आर क्षेत्र श्री. रामेश्वर सोमानी यांनी केलेल्या वाटणीपत्रानुसार श्री. अमित श्रीनिवास सोमानी यांच्या हिस्स्यास आलेले असून, त्याबाबत फेरफार क्र. 15476 अन्वये सदर क्षेत्राची नोंद श्री. अमित श्रीनिवास सोमानी यांच्या नावे करण्यात आलेली आहे.\nसदर वाटणीपत्राद्वारे प्राप्त झालेले 0 हे. 36 आर क्षेत्र हे यापूर्वीच इंडियन ऑइल कंपनीस भाडेपट्टा करारनाम्याद्वारे देण्यात आलेले आहे. तथापि, फेरफार क्र. 15476 अन्वये सदर क्षेत्राची नोंद अर्जदाराच्या यापूर्वीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली असल्याने सदर क्षेत्राची स्वतंत्र खाते नोंद झालेली नाही.\nत्यामुळे श्री. अमित श्रीनिवास सोमानी यांनी तलाठी कार्यालयास अर्ज सादर करून वाटणीपत्राद्वारे प्राप्त झालेले 0 हे. 36 आर क्षेत्र त्यांच्या यापूर्वीच्या क्षेत्रापासून स्वतंत्र करून स्वतंत्र 8-अ खात्यामध्ये नोंदविण्याची विनंती केलेली आहे.\nत्याअनुषंगाने अर्ज, वाटणीपत्र, फेरफार क्र. 15476, विद्यमान गाव नमुना 7/12 व 8-अ तसेच इंडियन ऑइल कंपनीसोबत केलेला भाडेपट्टा करारनामा यांची पडताळणी करून, नियमानुसार सदर 0 हे. 36 आर क्षेत्राची स्वतंत्र खाते नोंद करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "गणेश जगन खरात"
}
