{
  "village_code": "271800050228020000",
  "village_name": "बळेगांव",
  "taluka_name": "अबंड",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:45:29Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअपाक नोंद कमी करणे\nमौजे बळेगाव, ता. अंबड, जि. जालना येथील गट क्रमांक १५४ मधील खातेदार सक्षम शाहुराव देशमुख यांच्या वतीने त्यांचे वडील शाहुराव विनायकराव यांची अज्ञान पालक (अ.पा.क.) म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यात आलेली आहे.\nसदर खातेदार सक्षम शाहुराव देशमुख हे आता सज्ञान झालेले असल्याने त्यांच्या नावापुढे असलेली अज्ञान पालक (अ.पा.क.) म्हणून वडिलांची नोंद कमी करून स्वतःचे नाव सज्ञान खातेदार म्हणून नोंद घेण्याबाबत सक्षम शाहुराव देशमुख यांनी दिनांक ११/०८/२०२६ रोजीचे शपथपत्र सादर केलेले आहे. तसेच त्यासोबत आधारकार्डाची प्रत व शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत जोडलेली आहे.\nत्याअनुषंगाने संबंधित खातेदार सज्ञान झाल्याची व त्याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून मौजे बळेगाव येथील गट क्रमांक १५४ च्या सातबारा उताऱ्यावरील सक्षम शाहुराव देशमुख यांच्या नावापुढे असलेली अज्ञान पालक (अ.पा.क.) म्हणून वडील शाहुराव विनायकराव देशमुख यांची नोंद कमी करून सक्षम शाहुराव देशमुख यांची स्वतंत्र सज्ञान खातेदार म्हणून नोंद घेण्यात आली, फेरफार मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक संजय गवारे"
}
