{
  "village_code": "271900090243910000",
  "village_name": "बालानगर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:36:48Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे बालानगर येथील गट क्रमांक २९६ च्या सातबारा उताऱ्याची पाहणी केली असता, सदर जमिनीच्या मालकी हक्कात शेख नूर अमीर यांचे नाव नोंदविण्यात आलेले होते. तसेच सदर सातबारा उताऱ्याच्या इतर अधिकारातील सदरी त्यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद करण्यात आलेली होती.त्यानंतर शेख नूर अमीर यांच्या मालकी हक्कासंबंधी वारस फेरफार नोंद होऊन त्यांचे वारस पुत्र अहमद नूर शेख यांचे नाव मालकी हक्कात दाखल झालेले आहे. तथापि, सातबारा उताऱ्याच्या इतर अधिकारातील स्वतंत्र विहिरीची नोंद अद्याप शेख नूर अमीर यांच्या नावावर कायम आहे.त्यामुळे सदर विहिरीच्या नोंदीसंबंधी उपलब्ध अभिलेख, पूर्वीची फेरफार नोंद व वारस हक्कासंबंधी कागदपत्रे तपासून, सदर विहिरीवरील हक्क वारसाहक्काने अहमद नूर शेख यांच्याकडे आलेला असल्याचे सिद्ध झाल्यास, इतर अधिकारातील शेख नूर अमीर यांच्या नावावरील विहिरीची नोंद कमी करून त्याऐवजी अहमद नूर शेख यांचे नाव दाखल करण्यासाठी ही फेरफार नोंद घेण्यात येत आहे.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल भरतराव राऊत"
}
