{
  "village_code": "272000010246020000",
  "village_name": "वांझूळपाडा",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 355,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:20:55Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 53\nआदेश दिनांक : 07/10/2026\nम.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ अन्वये मा. तहसीलदार, सुरगाणा यांचे कडील उपरोक्त आदेशान्वये मौजे वांझुळपाडा येथील गट नं 56 चे खातेदार लक्ष्मण दौलत गायकवाड आणि श्रीराम दौलत गायकवाड यांनी त्यांचे मालकीची मिळकत गट नं.56 लागवड लायक क्षेत्र 2.20 हे.आर.पो.खराब क्षेत्र 0.49 हे.आर. आकार 1.50 रु.पै. यांचे आपसात वाटपाबाबत मा. तहसिलदार यांचे कडेस अर्ज केल्यानंतर धारण जमिनींचे विभाजन नियम १९६७ नुसार नोटीस नमुना ब गावी प्रसिद्ध करणेत आली होती. तसेच नमुना अ च्या नोटीसा बजावून सहहिस्सेदार यांना तहसिल कार्यालयात बोलावून जमीन वाटपाबाबत त्यांचे म्हणणे बाबत चौकशी करून जबाब घेनेत आले आहेत. चौकशी अंती सर्व सहधारक वारसांची संमती असल्याने मा. तहसिलदार यांचे परवानगीने खालील प्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nवाटपापूर्वीचा तपशील-\n१) गट नं. 56 लागवड लायक क्षेत्र 2.20 हे.आर. पो.खराब क्षेत्र 0.49 हे.आर. आकार 1.50 रु.पै. – लक्ष्मण दौलत गायकवाड आणि श्रीराम दौलत गायकवाड\nवाटपा नंतरचा तपशील-\n१) गट नं. 56 लागवड लायक क्षेत्र 1.10 हे.आर. पो.खराब क्षेत्र 0.24 हे.आर. आकार 0.75 रु.पै. – लक्ष्मण दौलत गायकवाड\n२) गट नं. 56 लागवड लायक क्षेत्र 1.10 हे.आर. पो.खराब क्षेत्र 0.25 हे.आर. आकार 0.75 रु.पै. –श्रीराम दौलत गायकवाड\nअटी व शर्ती खालीलप्रमाणे-\n१) मिळकतीचा ७/१२ उतारा वेगळा करण्यात येऊ नये.\n२) सदर जमीनीचे ७/१२ वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.\n३) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील सदर शेतजमिन असेल त्याच शर्तीवर व त्याच वर्गात विभाजनानंतर सदर जमीन राहिल.\n४) सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.\n५) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतीवर्षी भरावा.\n६) सदर शेतजमीनीतील पूर्वपार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील.\n७) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने व नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबधित जमीन धारण करणा-यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी जमीन धारकाची राहील.\n८) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेवून विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहील.\n९) सिलीग कायदयास बाधा येणार नाही या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n१०) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अशा खातेदारास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.\n११) सदर विभाजनामुळे अर्जदार भुमिहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.\n१२) सदर परवानगी उपोद्घातात नमुद अधिनियमान्वये देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वापरात बदल अथवा इतर परवानगी आवश्यक असल्यास अर्जदार यांनी त्यांचे स्तरावर परवानगी घेऊन जमीन वहिवाट करावयाची आहे. अर्जदार उपोद्घातात नमुद अधिनियमाचा भंग केल्यास सदर आदेशान्वये देण्यात आलेली परवानगी आपोआप रद्द होईल.\n१३) अर्जात नमुद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून ते बरोबर असल्याबाबत रु १००/-चे स्टॅम्पवर वाटपपत्र तयार करुन घेण्यात आलेले आहे.\n१४) सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n१५) सदर वाटप करतांना कोणतीही माहिती जाणुन-बूजुन लपविल्याचे उघड झाल्यास सदरचा आदेश रद्द करण्यात येईल.\n१६) सदर शेतजमिन / सर्वे नंबर संदर्भात या पुर्वीच्या नोंदी व मालकी हक्कावरुन वाद / लवाद निर्माण झाल्यास सदर आदेश रद्द ठरविणेत येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सहधारकांची राहील.\n१७) प्रस्तुत आदेशा विरुध्द कोणास काही एक हरकत असल्यास मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग कळवण यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७अन्वये प्रस्तुत आदेशाविरुध्द अपील दाखल करुन दाद मागता येईल.\nवरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटीचा व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\nवरील प्रमाणे अटी व शर्तीना अधीन राहून मा.तहसिलदार सुरगाणा यांचेकडील आदेश क्र.वाटप रजि.क्र./53/2026 सुरगाणा दिनांक 07/10/2026 प्रमाणे विभाजनाचा आदेश प्राप्त झालेने संबंधितांची नावे कमी/दाखल करणेत आली आहे.",
  "talathi": "जयश्री सुभाष वाडेकर"
}
