{
  "village_code": "272000040250240000",
  "village_name": "किकवारी खुर्द",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:56:34Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nआदेशाने -\nमुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 2) शासन परिपत्रक क्रमांक-14/89/सीआर-79/ल-9, दि.19/04/1979 3) विधी न्याय विभागाचा शासन निर्णय क्र. 166/बी, दिनांक 07/02/2015. 4) महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग चार व भाग आव दि.070/2/2014. 5) परिपत्रक क्रं. टिएनसी 04/2013/प्र.क्र. 196/1, दिनांक 11 फेब्रुवारी 2014. 6) शासन परिपत्रक क्रं. टिएनसी 04/2013/प्र.क्र.196/1, दि.07/05/2014 7) शासन शासन राजपत्र असाधारण भाग आउ, दि. 15/04/2026 8) श्री. आण्णाजी दोधा काकुळते, रा. किकवारी छु, बागलाण यांचा दिनांक 17/08/2026 रोजीचा अर्ज. तहसील कार्यालय बागलाण, क्रमांक/कु.का./कावि/824/2026 आदेश दिनांक 30/09/2026 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 मध्ये कुळ हक्काने मिळालेल्या जमिनी विक्री करण्यापूर्वी जिल्लहाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेण्याची तरतूद, सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.-1 अन्वये सुधारित करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल अशा कुळ जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण्याकरिता, ती गहाण ठेवण्याकरिता, ती पटट्याने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता काही अटी व शर्तीवर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आली आहे. या सुधारणेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना होण्याकरिता दिनांक 16/07/2014 रोजीच्या परिपत्रकानुसार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार श्री. आण्णानी दोधा काकुळते, रा. किकवारी खु., ता. बागलाण यांनी त्यांचे नाव दाखल असलेला मौने किकवारी खुदै, ता. बागलाण, येथील गट नं. 59 चे क्षेत्र 1.08 हे. आर., पो.ख. 0.03 हे. आर., आकार 0.75 रु. या शेतजमिनीवरील कुळकायद्याने प्राप्त जमीन नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी होणेबाबत अर्ज सादर केला आहे. मौजे किकवारी खु. येथील स.नं. 62/2 चे शेतजमिनीचे दोधा रायाजी पाटील हे मालक असल्याचे नोंद नं. 187 अन्वये दिसुन येते. सर्वे नं. 62/2 ला इतर अधिकारात सर्वसाधारण फक्कौरा विठ्ठल पाटील. हे दोधा रायाजी पाटील यांचे बाजुस नोंद नंबर 363 (दिनांक 16/08/1956) अन्वये दाखल झालेले आहे. तदनंतर दिनांक 19/07/1961 रोजी फकीरा विठ्ठल पाटील यांनी दोधा रायाजी पाटील यांचे पासुन सदर शेतजमीन खरेदी घेतली व कुळकायदा कलम 43 प्रमाणे नि.स.प्र.शेरा इतर अधिकारात घेतले व कुळाचे नाव कब्जेदार सदरी घेतले. शेतजमीन न्यायधीकरण व मे. मामलेदार बागलाण यांचेकडील हुकम नं. ALT/10/61 दिनांक 20/07/1961 वरुन नोंद नं. 438 दिसुन येते. तसेच कुळकायदा कलम 43 प्रमाणे नि.स.प्र.शेरा इतर अधिकारात दाखल पूर्वी नोंद नं. 438 ने घेतला असून सदर व्यवहार हा कायदेशीर झाल्याने पुन्हा नोंद करणेबाबत शेतजमीन न्यायधीकरण व मे. मामानेदार बागलाण यांचेकडील हुकम नं. ALT/10/61 दिनांक 10/05/1962 नुसार नोंद नं. 472 दिसून येते. तद्नंतर दिनांक 18/01/1966 रोजी फकीरा विठ्ठल पाटील मयत झाले व त्यांचे वारस दोधा फकीरा, निबाबाई शंकर, जिजाबाई दामु व सावित्राबाई फकीरा यांचे नावे नोंद नं. 527 नुसार दाखल झाल्याचे दिसते. त्यानंतर निंबाबाई शंकर, जिजाबाई दामु व सावित्राबाई फकीरा यांनी त्यांची नावे कमी करणेबाबत संमती दिल्याने त्यांचे नावे कमी झाल्याचे नोंद नं. 26 अन्वये दिसुन येते. तसेच दिनांक 08/12/1996 रोजी दोधा फकीरा पाटील यांनी आण्णाजी दोधा काकुळते यांना मा. उपविभागीय अधिकारी कळवण यांचे आदेश टेनसी / एसआर/34/96 दिनांक 06/11/2026 अन्वये परवानगी घेऊन खरेदी केल्याचे नोंद नं. 340 अन्वये दिसून येते. सदरची जमीन कुळाचे वारस यांचेच ताब्यात जमीन असून त्यांनी आकाराच्या 40 पट येणारी नजराणा रक्कम चलनाने शासकीय खजिन्यात जमा करण्याची आवश्यकता महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/04/2026 अन्वये आवश्यक नाही. त्यामुळे सदर मालकाने कुळास खरेदी दिल्याचा व्यवहार विधि अग्रहय ठरविता येणार नाही. उपरोक्त विवेचनावरुन मा तहसिलदार सो. बागलाण याचेकडील आदेश क्र./कु.का./कावी/८२४/२०२६ दि. ३०/०९/२०२६ अन्वये श्री. आण्णाजी दोधा काकुळते, रा. किकवारी खु., ता. बागलाण यांचे नाव दाखल असलेले मौजे किकवारी खुदे, ता. बागलाण, येथील गट नं. 59 चे क्षेत्र 1.08 हे. आर., पो.ख. 0.03 हे. आर., आकार 0.75 रु.या शेतजमिनीवरील कु. का. कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार हा धारणा प्रकार कमी करण्यात येवून खालसा धारणा प्रकार दाखल करण्याबाबत आदेश पारित केला असून आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "देविदास हिरामण चौधरी"
}
