{
  "village_code": "272000040250490000",
  "village_name": "नवेगाव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:23Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेले मौजे नवेगांव येथील जमीन मालक श्री. डोंगर परशराम बोरसे रा. मोरेनगर ता. बागलाण जि.नाशिक यांनी त्यांचे मालकीची मौजे नवेगाव ता.बागलाण येथील ग.नं. 164 क्षेत्र है. 3.46 आर पो.ख.1.28 आर आकार रू.1.56 पैसे ही आदिवासी खातेदाराने धारण केलेली मिळकत भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करून सदर मिळकती पैकी क्षेत्र है. 3. 26 आर पो.ख.0.68 आर आकार रू.1.46 पैसे मिळकत श्री.शुभम भास्कर राऊत रा. नवेगाव ता.बागलाण जि.नाशिक या दुस-या आदिवासी खातेदारास कृषिक प्रयोजनार्थ खरेदी- विक्री करणेकामी प्रस्ताव या कार्यालयात दाखल केलेला आहे.\nजमीन देणार व घेणार यांचेमधील साठेखत करारनामा व दुय्यम निबंधक श्रे यांचेकडील मुल्यांकन दाखला पहाता, मौजे नवेगाव ता.बागलाण येथील अर्ज मिळकतीचे मुल्यांकन रक्कम रू. 25,65,762/- (अक्षरी पंचवीस लाख पासष्ट हजार सातशे बासष्ट मात्र) निश्चीत करण्यात येत आहे. सबब, मी, अपर जिल्हाधिकारी मालेगाव या आदेशाव्दारे जमीन मालक श्री. डोंगर परशराम बोरसे रा. मोरेनगर ता. बागलाण जि.नाशिक यांचे मालकीची मौजे नवेगाव ता.बागलाण येथील ग.नं. 164 क्षेत्र हे. 3.46 आर पो.ख.1.28 आर आकार रू. 1.56 पैसे ही आदिवासी खातेदाराने धारण केलेली मिळकत भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करून सदर मिळकती पैकी क्षेत्र हे.3.26 आर पो.ख.0.68 आर आकार रू.1.46 पैसे मिळकत श्री. शुभम भास्कर राऊत रा. नवेगाव ता. बागलाण जि. नाशिक या दुस- या आदिवासी खातेदारास कृषिक प्रयोजनार्थ खरेदी-विक्री करणे बाबतच्या प्रस्तावास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) अन्वये खालील अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.\nअटी व शर्ती\n१) जमीन मालक श्री. डोंगर परशराम बोरसे यांना मौजे नवेगाव ता.बागलाण येथील प्रश्नाधिन मिळकत श्री. शुभम भास्कर राऊत यांनाच विक्री करता येईल.\n२) मौजे नवेगाव ता.बागलाण येथील प्रश्नाधिन मिळकत खरेदी नंतर जमिन घेणार श्री. शुभम भास्कर राऊत हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36अ ला अधिन राहून भोगवटादार वर्ग-1 धारणा प्रकारावर शेती कामासाठीच धारण करतील.\n३) जमिन खरेदी घेणार व देणार यांनी ते आदिवासी असल्याचे पुरावे, शेतकरी पुरावा इ. कागदपत्रावरुनच सदरची परवानगी देण्यात येत आहे. सदरचे पुरावे खोटे आढळल्यास प्रस्तुतची परवानगी रद्द करण्यात येईल.\n४) सदर बाबत मौजे नवेगाव ता. बागलाण येथील अर्ज मिळकतीच्या इतर अधिकारातील शेरे / वित्तीय संस्थेचे बोजे कायम ठेवण्यात यावेत.\n५) सदर जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हा आदेशाचे दिनांकापासून तीन महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n६) जमीन देणार व घेणार यांचेमधील साठेखत करारनामा व दुय्यम निबंधक यांचेकडील मुल्यांकन दाखला पहाता, मौजे नवेगाव ता.बागलाण येथील अर्ज मिळकतीचे मुल्यांकन रक्कम रु.25,65,762/- (अक्षरी पंचवीस लाख पासष्ट हजार सातशे बासष्ट मात्र) निश्चीत करण्यात येत आहे.\n७) तहसीलदार बागलाण / ग्राम महसूल अधिकारी नवेगाव ता.बागलाण यांनी वरीलप्रमाणे आदिवासी खातेदार यांचे नावे राष्ट्रीयकृत बँक खात्यात रक्कम अदा झालेची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात सदर खरेदी-विक्री व्यवहाराचा अंमल घेण्यात येऊ नये.\n८) सदर परवानगीनंतर मौजे नवेगाव ता.बागलाण येथील अर्ज मिळकतीच्या इतर हक्कात दाखल नोंदी कायम राहतील.\n९) सदर जमिनीचा वापर अकृषिक प्रयोजनार्थ करावयाचा झाल्यास सक्षम प्राधिकारी यांचेकडुन बिनशेती परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n१०) खरेदीदार अर्ज मिळकती विकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करता येणार नाही.\n११) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणांमध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्र यांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.\n१२) सदर मिळकती संदर्भात वित्तीय बोजे असल्यास किंवा भविष्यात निर्माण झाल्यास त्याची परतफेड करण्याची जबाबदारी\nराहील.\n१३) खरेदीदाराने जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनार्थ करावा. या व्यतिरीक्त इतर कारणासाठी उपयोग करावयाचा\nजिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार अनर्जित उप्तनाची रक्कम शासनास अदा करावी लागेल.\n१४) सदरचे जमीनीच्या 7/12 उता-याच्या इतर हक्कात जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36अ ला अधिन सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा कायम ठेवण्यात यावा.\n१५) अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सटर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील.\n१६) भविष्या अर्ज मिळकती संदर्भात हरकत / तक्रार प्राप्त झाल्यास व तपासणी अंती प्रस्तुत हरकत / तक्रारी मध्ये तथ्य आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\n१७) अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n१८) अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळुन आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळुन आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद होण्यास पात्र राहील.\n१९) सदरची परवानगी फक्त याचा कायद्यांतर्गत देण्यात आलेली आहे. या संबंधात कुळ कायदा कलम 1948; नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियम) अधिनियम 1966, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असल्यास तरी तशी परवानगी घेणे संबंधितावर बंधनकारक राहील.\n२०) सदरच्या विक्री व्यवहाराला खालील कायद्याच्या तरतूदी लागु राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961\nब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम कायदा, 1948\nक) इतर कायद्याच्या तरतूदी\nड) तुकडेबंदी तुकडेजोड कायदा, 1947\nइ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966\nई) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम, 1974\nवरील प्रमाणे आदेशातील सर्व अटी व शर्तीना अधिन राहुन मा अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव यांचेकडील आदेश क्र.आदि ते आदि /एस.आर./66/2025 दि. 11/02/2026 अन्वये श्री. डोंगर परशराम बोरसे रा. मोरेनगर ता. बागलाण जि.नाशिक यांचे मालकीची मौजे नवेगाव ता.बागलाण येथील ग.नं. 164 क्षेत्र हे. 3.46 आर पो.ख.1.28 आर आकार रू. 1.56 पैसे ही आदिवासी खातेदाराने धारण केलेली मिळकत भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेकामी परवानगी दिली असे. आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "देविदास हिरामण चौधरी"
}
