{
  "village_code": "272000050251420000",
  "village_name": "मुंगसे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:35Z",
  "surveys": [
    "31/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी मालेगांव यांचेकडील आदेशान्वये मौजे-मुंगसे येथील ग.नं. 31/अ पैकी संजय श्रीपत सुर्यवंशी व इतर 3 यांचे स्वतंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 0 हे. 13 आर पो.ख. 0 हे. 05 आर आकार रू. 0.27 पैसे व केवळ तुकाराम सुर्यवंशी यांचे स्वतंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 0.13 आर पो.ख. 0 हे. 04 आर आकार 0.26 पैसे नवीन अविभाज्य शर्तीच्या भोगवटादार वर्ग-2 शेतजमीनीचे कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-1 मध्ये खालील अटी व शर्तीस अधिन राहून रुपांतरण करणेबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.\nअटी व शती :-\n1. उक्त आदेशानंतर जमीन मालक श्री. संजय श्रीपत सुर्यवंशी इतर-3, व श्री. केवळ तुकाराम सुर्यवंशी व इतर-1, हे मौजे मुंगसे ता. मालेगांव येथील अर्ज मिळकत भोगवटादार वर्ग 1 धारणाधिकारावर कृषिक प्रयोजनार्थ धारण करतील.\n2. विषयांकीत जमीनीचा अकृषिक प्रयोजनासाठी वापर करावयाचा झाल्यास, सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल व अशी परवानगी देत असताना नियमानुसार येणारी अधिमुल्यांची रक्कम शासनास अदा करणे जमीन धारक यांना बंधनकारक राहील.\n3. प्रस्तुत जमीनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण झाल्यावर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 व महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 मधील तरतुदीचा भंग होणार नाही याची तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी.\n4. विषयांकीत जमीनीच्या रुपांतर अधिमूल्य आकारणीच्या रकमेबाबत भविष्यात लेखापरीक्षणात तफावत आढळून आल्यास येणारी फरकाची रक्कम शासनजमा करणे जमीन मालक यांना बंधकारक राहील. सदर रक्कम न भरल्यास जमीन महसूलाची थकबाकी म्हणून सक्तीने वसूल करण्यात येईल.\n5. संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रस्तुत शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर भुधारणा पध्दती भोगवटादर वर्ग 1 व इतर अधिकारात अशी नोंद घेण्यात यावी.\n6. अर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले सर्व कागदपत्रे सत्य आहेत असे गृहीत धरुन सदर नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली शेतजमीन भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये कृषिक प्रयोजनासाठी रुपांतरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. भविष्यात यात कोणतीही असत्यता आढळल्यास किंवा मालकी हक्काबाबत विवाद निर्माण झाल्यास ती निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार (जमीन मालक) यांची राहील.\n7. प्रस्तुत जमीनीची रीतसर मोजणी करुन घेऊन 7/12 उतारा स्वतंत्र करण्याची व निघाल्यास जमीन महसूलाची थकबाकी शासनजमा करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n8. अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील.\n9. अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n10. अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळुन आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळुन आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\n11. या आदेशातील कोणत्याही शर्त अगर अटींचा भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\nमा.अपर जिल्हाधिकारी मालेगांव यांचेकडील आदेश जा.क्र./न.अ.श./भोग.-1/एस.आर./152/2025 दि.01/02/2026",
  "talathi": "विद्याधर विश्वासराव गायकवाड"
}
