{
  "village_code": "272000060252430000",
  "village_name": "क्रांतीनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:22:39Z",
  "surveys": [
    "109/1",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 235/2026 नांदगाव\nआदेश दिनांक : 28/10/2026\nआदेश :-\nअर्जदार विलास लक्ष्मीकांत शांडील्य व इतर रा. नाशिक ता.नांदगाव जि.नाशिक येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे क्रांतीनगर ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 109/1, 81 ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार खालील प्रमाणे विभाजन केले असे.\n1) ग.नं. 109/1, क्षेत्र 3 हे. 42 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 13 रु 62 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- हेमंत लक्ष्मीकांत शांडिल्य\n2) ग.नं. 81 क्षेत्र 2 हे. 02 आर, पो.ख. 0 हे 02 आर, आकार 9 रु 50 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- हेमंत लक्ष्मीकांत शांडिल्य\nवहिवाट हक्क :-\nवर कलम 1 अ व 1 ब मध्ये वर्णन केलेल्या दोन्ही वाटप मिळकतींस पुर्वापार वहिवाट वापर रस्ता असून सदरहू पुर्वापार वहिवाट वापर रस्ता हा दोन्ही वाटप मिळकतींस वापर करणेकामी आहे व राहील.\nपाणी हक्क:-\nवर कलम 1 अ मध्ये वर्णन केलेल्या वाटप मिळकतींस अन्य सर्व्हे नंबर विहीरीतील असलेला पाणी हिस्सा हा अ.नं.2 नामे. हेमत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे वाटपांस दिला असून तसेच वर कलम 1 व मध्ये वर्णन केलेल्या वाटप मिळकतीतील संपुर्ण बोअरवेल तसेच गटातील विहीरीतील 2/3 पाणी हिस्सा हा अ.नं.2 नामे हेमत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे वाटपास दिला असून सदरहू ज्या त्या पाणी हिश्यातील व बोअरवेलमधील अ.नं.1, 3, 4 व 5 यांनी ज्याचा त्याचा हक्क ज्याने त्याने वाटपधारक अ.नं. 2 नामे हेमत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे लाभात सोडलेला आहे.\nहक्कसोडबाबत :-\nवर कलम 1 अ मध्ये वर्णन केलेल्या वाटप मिळकतींस अन्य सर्व्हे नंबर विहीरीतील असलेला पाणी हिस्सा हा अ.नं.2 नामे. हेमत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे वाटपांस दिला असून तसेच वर कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या वाटप मिळकतीतील संपुर्ण बोअरवेल तसेच गटातील विहीरीतील 2/3 पाणी हिस्सा हा अ.नं.2 नामे हेमंत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे वाटपास दिला असून सदरहू ज्या त्या पाणी हिश्यातील व बोअरवेलमधील अ.नं. 1, 3, 4 व 5 यांनी ज्याचा त्याचा हक्क ज्याने त्याने वाटपधारक अ.नं. 2 नामे हेमंत लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे लाभात सोडलेला आहे.\nमयताबाबत :-\nवर कलम 1 अ व 1 ब मध्ये वर्णन केलेल्या गट नं.109/1 व गट नं.81 या दोन्ही मिळकतींच्या भोगवटदार सदरी अ.न. 1 ते 5 यांचेसोबत अ.न. 1 व 2 यांची मयत आई कै. इंदीरा लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे नांव यापुर्वीच दाखल असून कै. इंदीरा लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे मृत्यूपश्चात अ.नं. 1 व 2 व त्यांच्या वर नमुद केलेल्या बहिणी हे मयताचे मुले व मुली कायदेशीर वारस असून त्यापैकी बहिणींनी वर नमुद केलेप्रमाणे पुर्वीच आपले कायमस्वरूपीचे हक्क दोन्ही मिळकतीतून सोडून दिलेले असल्याने आजमितीस अ.नं. 1 व 2 हेच मयत कै. इंदीरा यांचे वारस असून कै. इंदीरा लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे सर्व वारसांनी सदरहू वाटपांस संमती दिली असल्याने अधिकार अभिलेखांतील मयत कै. इंदीरा लक्ष्मीकांत शांडिल्य ह्या मयत असल्याने व त्यांचे वारस यांपुर्वीच यापुर्वीच अधिकार अभिलेखांत दाखल असल्याने मयत कै. इंदीरा लक्ष्मीकांत शांडिल्य यांचे नांव अधिकार अभिलेखांतून कमी करून सदरहू वाटपांस अंमल देण्यात यावा.\nइतर अधिकारांतील झाडांच्या शेऱ्याबाबतः-\nवर कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या गट नं.81 या मिळकतीच्या अधिकार अभिलेखांत इतर अधिकारांत आंबे 3, निंब 20 अशी नोंद असून आजमितीस सदरहू मिळकतीत नोंदीप्रमाणे कोणतीही वर नमुद केलेली झाडे अस्तित्वात नसून सर्व झाडे नैसर्गिकरित्या नष्ट झालेली असल्याने सदरच्या झाडांबाबतचा शेरा देखील कमी करून सदरहू वाटपांस अंमल देण्यात यावा.\nअटी व शर्ती –\n1) सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे\n2) सदर जमिनीचे नवीन पोटहिस्से करून स्वतंत्र 7/12 वेगळा करू नये.\n3) जमिनीची शर्त कायम राहील.\n4) सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांनी राहील.\n5) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n6) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n7) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेउन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n8) सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n9) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीं चा फायदा घेता येणार नाही.\n10) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n11) सदर विभाजनाबाबत / बोजाबाबत अथवा जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास, अथवा भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल तसेच मे. न्यायालयाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील.\n12) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\nवरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 235/2026 नांदगाव दिनांक 28/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "धीरज सुभाष विखे"
}
