{
  "village_code": "272000060252610000",
  "village_name": "वडाळी खुर्द",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:03:03Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/239/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nआदेश वाटप :- अर्जदार शशिकांत संजय फरताळे व इतर रा. वडाळी खुर्द ता. नांदगाव जि. नाशिक यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वडाळी खुर्द ता. नांदगाव, जि. नाशिक येथील ग.नं- 5 या जमिनीचे मा. न्यायाधीश सो. दिवाणी न्यायालय क स्तर नांदगाव यांचेकडील हुकूमनामा रे मू नं 17/2021 आदेश प्रमाणे विभाजनाबाबत मा. तहसीलदार सो. नांदगाव यांचेकडे अर्ज केला असे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनींचे विभाजन नियम, 1967 नुसार विभाजनास खालीलप्रमाणे परवानगी दिली असे. मा. तहसीलदार सो. नांदगाव यांच्या आदेशानुसार खालील प्रमाणे वाटप केली असे.\n1) ग. नं. 5, क्षेत्र 0 हे 03 आर, पो.ख. 0 हे 02 आर, आकार 0 रु. 01 पैसे, दिशा उत्तर बाजूकडील पूर्व पश्चिम लांबीचे क्षेत्र (उत्तरेकडील पहिली वाटणी), विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- शशिकांत संजय फरताळे\n2) ग. नं. 5, क्षेत्र 0 हे 06 आर, पो.ख. 0 हे 02 आर, आकार 0 रु. 02 पैसे, दिशा पूर्व पश्चिम लांबीचे क्षेत्र (उत्तरेकडील चौथी वाटणी), विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- गणपत झिप्रू फरताळे\n3) ग. नं. 5, क्षेत्र 0 हे 07 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु. 02 पैसे, दिशा पूर्व पश्चिम लांबीचे क्षेत्र (उत्तरेकडील तिसरी वाटणी), विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- जयेश वाल्मीक फरताळे\n4) ग. नं. 5, क्षेत्र 0 हे 03 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु. 01 पैसे, दिशा पूर्व पश्चिम लांबीचे क्षेत्र (उत्तरेकडील दुसरी वाटणी), विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- दिलीप एकनाथ फरताळे\nआम्ही आपापसात कुटुंबातील भावांचे कोर्टमध्ये सरस निरस मानाने वाटप केले असून आम्हाला ते मान्य आहे. आमचे आपसात वाटप झालेले असल्यामुळे अ.क्र. ५) ताराबाई ज्ञानेश्वर गायकवाड ६) उषाबाई श्रीधर गडाख ७) सिताबाई संजय फरताळे ८) निलीमा राहुल गायकवाड ९) छाया अजय गडाख यांचा सदर मिळकतीमध्ये असलेला कायदेशीर हिस्सा त्यांनी विना मोबदला त्यांनी कायम स्वरूपी सोडलेला आहे.\nटीप-निरंक\nअटी व शर्ती-\n१ सदर जमिनीचे ७/१२ वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.\n२ सदर जमिनीचे नवीन पोटहिस्से करून स्वतंत्र ७/१२ वेगळा करू नये.\n३ सदर जमिनीचे मालकी हक्का बाबत /बोजा बाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल.\n४ वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n५ विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n६ वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n७ सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n८ खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.\n९ अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टँपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n१० प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता ७/१२ उताऱ्यावरील अभिलेखात दाखल असलेली अर्जदार अ.क्र. ५) ताराबाई ज्ञानेश्वर गायकवाड ६) उषाबाई श्रीधर गडाख ७) सिताबाई संजय फरताळे ८) निलीमा राहुल गायकवाड ९) छाया अजय गडाख यांनी वरील मिळकतीमध्ये हिस्सा घेतलेला नसून त्यांनी त्यांच्या भावाच्या लाभात हककसोड करून त्यांनी हकक सोडून दिला असल्याने त्यांची नावे कमी करण्यात यावी.\n११ सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास/ बोजा बाबत / मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल, तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबंधितांवर बंधनकारक राहतील.\n१२ वरील अटी व शर्तींपैकी कोणत्याही अटी व शर्तींचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\nवरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. नांदगाव यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय, नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/239/2026 दिनांक 28/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन सिताराम ढगे"
}
