{
  "village_code": "272000060252830000",
  "village_name": "साकोरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6717,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:34Z",
  "surveys": [
    "529"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि-1344/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nआदेश :-\nमौजे साकोरा, ता. नांदगाव येथील गट क्र. 529 मधील 0.80 आर क्षेत्र जमीन श्री. नंदुलाल मुरलीधर अहिरे (वय 65, रा. हनुमान नगर, गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी खरेदीखत दस्त क्र. 2849/2026 (दिनांक 25/06/2026) अन्वये खरेदी केली आहे. सदर खरेदीच्या आधारे फेरफार नोंद क्र. 6604 मंजूर करण्यात आली आहे. परंतु, खरेदीखतामध्ये स्पष्ट नमूद असल्याप्रमाणे सदर जमिनीतील विहिरीतील 0.33 पैसे हिस्सा इतर अधिकारात नोंदविला गेलेला नाही. त्यामुळे खरेदीखतातील नोंदीनुसार विहिरीच्या हिश्ष्याची नोंद इतर अधिकारात होण्यास अर्जदाराने विनंती केली आहे.\nत्यानुषंगाने मंडळ अधिकारी नांदगांव यांनी अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. तो पुढील प्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय नांदगाव येथील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 2849/2026 (दि. 25/06/2026) ची पडताळणी केली असता, त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की, विक्री देणार भालचंद्र आबाळू कोळी यांच्या मालकीच्या 0.75 पैसे विहिरीच्या हिश्ष्यापैकी 0.33 पैसे हिस्सा (पाण्याचा व जाण्या-येण्याच्या रस्त्याचा हक्कासह) खरेदीदार श्री. नंदुलाल मुरलीधर अहिरे यांना कायम खरेदी दिला आहे. सदर फेरफार नोंदीच्या मजकुरात विहिरीतील 0.33 पैसे हिश्ष्याचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु, 7/12 च्या इतर अधिकार सदरी सदर विहिरीच्या हिश्ष्याची नोंद प्रविष्ट होण्याचे राहून गेल्याचे दिसून येते. मूळ मालक भालचंद्र आबाळू कोळी यांच्याकडे गट क्र. 529 मधील विहिरीत एकूण 0.75 पैसे हिस्सा होता. त्यापैकी 0.33 पैसे हिस्सा अर्जदारास विक्री करण्यात आला असून उर्वरित 0.42 पैसे हिस्सा मूळ मालकाकडे कायम राहिलेला आहे.\nअर्जदार श्री. नंदुलाल मुरलीधर अहिरे यांच्या अर्जात व मागणीत पूर्णपणे तथ्य आहे. नोंदणीकृत खरेदीखत क्र. 2849/2026 व फेरफार नोंद क्र. 6604 मधील अटी व शर्तीनुसार मौजे साकोरा येथील गट क्र. 529 च्या 7/12 अभिलेखात इतर अधिकार कॉलममध्ये दस्त क्र. 2849/2026 व फेरफार 6604 अन्वये विहिरीत 0.33 पैसे पाणी वापरण्याचा हिस्सा नंदुलाल मुरलीधर अहिरे अशी पूरक नोद प्रविष्ट करण्यासाठी योग्य तो आदेश व्हावा अशी या कार्यालयाची शिफारस आहे. असा मंडळ अधिकारी नांदगांव यांनी अहवाल सादर केला आहे. त्याअर्थी सदर प्रकरर्णी सर्व कागदपत्रे पाहुन व अवलोकन केले असता तहसिलदार नांदगांव प्राप्त अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम ३,५,६, व ७ नुसार पुढीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.\nआदेशः\nमौजे साकोरा, ता. नांदगाव येथील गट क्र. 529 च्या 7/12 व फेरफार अभिलेखातील इतर अधिकार कॉलममध्ये दस्त क्र. 2849/2026 व फेरफार नोंद क्र. 6604 अन्वये विहिरीत 0.33 पैसे पाणी वापरण्याचा व जाण्या-येण्याच्या रस्त्याचा हक्क श्री. नंदुलाल मुरलीधर अहिरे यांचा आहे .\nमा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि-1344/2026 दिनांक 14/10/2026 आदेशांवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
