{
  "village_code": "272000080255420000",
  "village_name": "शिंदवड",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:39Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nदेवस्थान इनाम ट्रस्टबाबत\nमौजे शिंदवड ता. दिंडोरी, येथील गट नं ९७ च्या ७/१२ वरती “श्री मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड शिदवड” या न्यासाचे नांव दाखल करणेबाबत तहसील कार्यालय दिंडोरी येथे अर्ज दाखल झालेवरून सदर अर्ज मंडळ अधिकारी वरखेडा यांचेकडेस स्थानिक चौकशी कामी पाठविला असता, त्यांनी त्यांचा अहवाल जा.क्र. २४१/२०२५ दि. १५/०९/२०२५ अन्वये तहसील कार्यालय दिंडोरी प्राप्त झालेवरून..त्यात नमूद प्रकरणातील कागदपत्र व मंडळ अधिकारी यांचे अहवालाचे अवलोकन केले असता.. अर्जदार यांनी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचे कडील आदेश निशाणी- ४० योजना अर्ज क्रमांक २६/२०२३ दिनांक १६/१२/२०२४ नुसार मौजे शिंदवड ता. दिंडोरी येथील गट नं ९७ हा \"इनाम वर्ग-३\" हे निरंतर इनाम असुन व्यक्तीगत किंवा वडिलोपार्जित इनाम नाही. तसेच आदेशातील अनुसुची (अ) नुसार श्री. मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड, शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक नॉ.क्र.ए.१४१५ (नाशिक) या न्यासास. योजना अर्ज क्र. २६/२०२३ मधील दिनांक १३/१२/२०२४ रोजी पारीत केलेल्या निर्णयानुसार या न्यासाला सुयोग्य आणि सुनियोजित व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० चे कलम ५० अ (१) अन्वये मंजुर करण्यात आले आहे. त्यानुसार श्री. मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड, शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक असे नाव देण्यात आले आहे. सदर न्यासाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. न्यासाचे हिशोबाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील. अनुसूची अ मध्ये नमुद केले प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम केले जातील. तसेच सामाजिक व शैक्षणिक कामे केले जातील. तसेच हया न्यासाच्या नोंदणी प्रमाणे नियुक्त केलेले १५ विश्वस्त असतील विश्वस्तांची संख्या कमीत कमी ११ व जास्तीत जास्त १५ ठेवण्यात येईल. विश्वस्तांचा कार्यकाळ हा ५ वर्षांचा राहील. न्यासामधील विश्वस्तांची नेमणुक ही विशेष ग्रामसभेतून करण्यात येईल.\nमौजे शिदवड, ता. दिंडोरी गांवामधील रहीवासी असलेस व्यक्ती मार्तंड देवस्थानच्याच भक्त असलेल्या व्यक्तीचा विश्वस्तांसाठी अर्ज करण्याचा अधिकार राहील. विशेष ग्रामसभेत वाद निर्माण झाल्यास विश्वस्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार विभागीय धर्मादाय सह. आयुक्त नाशिक यांना राहील. ५ वर्षानंतर धर्मादाय सह. आयुक्त विश्वस्तांची नेमणुक करतील. न्यासातील इतर सर्व बाबी मा. धर्मादाय सह. आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचे दिनांक १६/१२/२०२४ चे आदेशात नमूद आहेत.\nमा धर्मादाय सह. आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचेकडुन दिनांक ०५/०४/२०२३ रोजी अ.१४१५ (नाशिक) या नोंदणी क्रमांकाने न्यास नोंदणी झाला असून दिनांक १६/१२/२०२४ रोजो न्यासाच्या कारभारासाठी\nनियमावली तयार केली आहे. सदर न्यास नोंदणी झाल्यापासुन रत्नगड देवस्थान व देवस्थानच्या सर्व मालमत्तेचे व्यवस्थापन हे श्री. मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड हा न्यासच करीत आहे. यास्तव \"श्री. मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड, शिदवड\" यांचे नाव गट नं. ९७ वर लावणेत यावे ही विश्वस्तांची मागणी मान्य करणेस हरकत नाही असा अहवाल मंडळ अधिकारी वरखेडा यांनी सादर केला आहे.\nअन्वये मौजे शिंदवड येथील गट नं. ९७ क्षेत्र ५.२६ हे.आर पोख ०.०१ हे.आर आकार ०.८१ रु.पैसे असून इतर अधिकारातील नावे १)आनंदा दशरथ पवार,२)मुरलीधर विठोबा बस्ते,३)सोनुबाई देवाजी पवार,४)वेनुबाई मर्द नारायण टर्ले,५)राहीबाई मर्द गोपाळा शेटे हे इतरहक्की दाखल असून ते इतर हक्की कमी केले व कब्जेदार सदरी \"श्री मल्हारी मार्तंड देवस्थान ट्रस्ट रत्नगड शिदवड\" असे न्यासाचे नाव दाखल केले.\nगावी मा. सहायक धर्मादाय आयुक्त नाशिक यांचेकडील आदेश नॉ.क्र.ए.१४१५ (नाशिक) या न्यासास योजना अर्ज क्र.२६/२०२३ मधील दिनांक १३/१२/२०२४ रोजी पारीत केलेला निर्णय, मा. अपर आयुक्त, नाशिक यांचा आदेश क्र. आरटीएस/पुर्नस्थापित/११३/२०१९ दि. २६/१२/२०१९, उपविभागीय अधिकारी दिंडोरी, उपविभाग दिंडोरी यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/१६५/२०१३ दि. २८/१०/२०१५ आणि मा. तहसीलदार दिंडोरी यांचा आदेश क्र आरटीएस/तक्रार नोंद क्र.१३६२/२०११ दि. २६/११/२०१२,तसेच मा.तहसीलदार सो दिंडोरी यांचेकडील क्र.वतन/कुका.कावी/१३२६/२०२५ दि.२५/११/२०२५ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "नितिन शिवाजी जाधव"
}
