{
  "village_code": "272000110258910000",
  "village_name": "जातेगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2049,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:22:44Z",
  "surveys": [
    "426"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा. तहसीलदार सो. नाशिक यांचेकडिल आदेश जाक्र.कुका/कावि/763/2026 दि: 18/08/2026\nअर्जदार श्री. विनायक सखाराम नेटावटे रा. आगारटाकळी, ता. जि. नाशिक व इतर यांनी मौजे जातेगांव ता. जि. नाशिक येथील गट नंबर 426 या मिळकतीचे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील स. सा. कुळ नामदेव गंगाराम सदगीर (2) हा शेरा कमी करणेबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार सदरचा अर्ज मंडळ अधिकारी महिरावणी यांचेकडे पुढील चौकशीकामी पाठविला असता मंडळ अधिकारी महिरावणी यांनी सविस्तर अहवाल इकडील कार्यालयात सादर केला होता.\nमौजे- जातेगांव ता. जि. नाशिक येथील गट नंबर 426 चे एकूण क्षेत्र 0.18.70 हे. आर. चौ. मी. इतके क्षेत्र असून सन 1942-43 चा 7/12 पाहता, सदरची मिळकत किसन हनमंता नेटावटे यांचे मालकीची असल्याचे दिसून येते. सन 1958 मध्ये किसन हनमंता नेटावटे यांचे निधन झाल्यानंतर सदर मिळकतीवर वारस म्हणून अर्जदार यांचे वडील श्री. सखाराम किसन नेटावटे व चुलते भिका किसन नेटावटे यांचे नाव दाखल झाले असून त्यांची गाव नमुना 6/7 मध्ये नोंद 687 घेण्यात आली आहे.\nप्रकरणी नोंद नंबर 775 अन्वये नामदेव गंगाराम यांचा कब्जा नसल्याने त्यांचे इतर अधिकारातील कुळ म्हणून नाव कमी केले आहे. सदर नोंदीचा अंमल 7/12 वर घेण्यात आलेला नसल्याने इतर अधिकारात कुळाचे नाव कायम राहिलेले आहे.\nतरी नमूद परिस्थिती व दाखल कागदपत्रांचे यांचे अवलोकन केले असता, इतर हक्कात दाखल असलेले स. सा. कुळ नामदेव गंगाराम सदगीर (2) हे नाव पोकळीत असल्याचे दिसून येते.\nतरी वरील नमूद दाखल पुरावे वरून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 14,32-ग व कलम 32-ओ च्या तरतुदी विचारात घेऊन शेतजमीन मौजे जातेगांव ता. जि. नाशिक येथील गट नंबर 426 या मिळकतीचे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील स. सा. कुळ नामदेव गंगाराम सदगीर (2) हे नाव कमी करणेस हरकत नाही.\nत्यामुळे मा. तहसिलदार सो. नाशिक यांनी मौजे जातेगांव ता. जि. नाशिक येथील गट नंबर 426 या मिळकतीचे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील स. सा. कुळ नामदेव गंगाराम सदगीर (2) नाव कमी करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले.\nमौजे जातेगांव ता. जि. नाशिक येथील गट नंबर 426 या मिळकतीचे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील स. सा. कुळ नामदेव गंगाराम सदगीर (2) हे नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार कमी करणेबाबत आदेश देण्यात आले.\nउपरोक्त आदेशाप्रमाणे मिळकतीवर अंमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
