{
  "village_code": "272000120259400000",
  "village_name": "वाळविहिर",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:00:46Z",
  "surveys": [
    "503"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nभोराबाई मर्द देवराम पोकळे रा. वाळविहिर(खाता क्रमांक667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक503, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रताप विठ्ठल जाखेरे , (खाता क्रमांक :-870)गट/सर्व्हे क्रमांक 503 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3082 दिनांक 18/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1305832 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करनेकामी प्राप्त आदेश, मा.सहायय जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्रयंबकेश्वर यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अपील /348/2025 दि.15/07/2026 यांचे कडील आदेश वरून नोंद करण्यात आली.\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक\nकक्ष-4/कुका-2/एस.आर.164/2023\nनाशिक दिनांक 21 /06/2025\nआदेश\nज्याअर्थी मौजे वाळविहीर, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 01 हे. 21 आर, आकार रु 1.25 पैसे, ही मिळकत भोराबाई देवराम पोकळे, रा. म. वाळविहीर, पो. कोरपगांव, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांचे मालकी व हिश्याची जमीन आहे. त्यांनी दि. 17/11/2023 रोजी अर्ज करुन त्यांचे मालकीचे विक्री करावयाचे क्षेत्र 01हे. 21 आर हे श्री. प्रताप विठ्ठल जाखेरे, रा. मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांना कृषक प्रयोजनार्थ विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे.\nतहसिलदार इगतपुरी यांच्याकडील चौकशी अहवाल व प्रकरणी दाखिल कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, प्रस्तुत जमीन खरेदी घणार हे शेतकरी असून महादेव कोळी या आदिवासी जमातीचे आहेत. सदर मिळकत खरेदीनंतर त्यांचेकडे कमाल जमीन धारणा मयादपेक्षा अधिक क्षेत्र होत नाही. तसेच विषयांकित मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद प्रलंबित नसून सदर व्यवहाराबाबत हितसंबंधितांची कोणतीही हरकत नाही. याशिवाय प्रस्तुत मिळकत विक्रीनंतर मूळ जमीन मालक भूमिहान होत नाही.\nत्याअर्थी मी, अपर जिल्हाधिकारी नाशिक या आदेशाद्वारे मौजे वाळविहीर ता.इगतपुरी , येथील गट में 503 अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी क्षेत्र 01हे.21 आर आकार 1.25 पैसे हि जमीन भोराबाई देवराम पोकळे, रा. मु.वाळविहीर ता.इगतपुरी जी. नाशिक यांनी धारण केलेली श्री.विठ्ठल जाखेरे, रा. मोगरे, ता. इगतपुरी, जि.नाशिक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार खालील अटी व शर्तवर अधीन राहून कृषक प्रयोजनार्थ विक्री करणेस परवानगी देत आहे.\nअटी व शर्ती\n1.भोराबाई देवराम पोकळे, रा. मु. वाळविहीर पो. कारपगाव, ता. इगतपुरी, जि.नाशिक यांची जमीन श्री. प्रताप विठ्ठल जाखेरे, रा. मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांनाच विक्री करता येईल.\n2.श्री. प्रताप विठ्ठल जाखरे, रा. मोगरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 36 व 36 अ ला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n3.जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील 4.खरेदीदस्तावर जमीन मालक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.\n5.सदर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा दिवसांनंतर व तीन महिन्याच्या पर्यंत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n6.प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही तृटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील.\n7.सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n8.सदर जमीनीचे साठेखताची रक्कम ही रू. 13,00,000/- ही व्यवहाराची रक्कम असून मुल्यांकनाची रक्कम रु. 13,05,832/- एवढी आहे. मुल्यांकनातील रक्कम साठेखतातील रक्कमेपेक्षा अधिक असल्याने मुल्यांकनाची रक्कम ही जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नांवे रक्कम रु. 13,05,832/- (अक्षरी रक्कम तेरा लाख पाच हजार आठशे बत्तीस मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व याबाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबत प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करु नये.\n9.प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नविन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नविन भूधाकराचे एकुण क्षेत्र लागू असले स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.\n10. तहसिलदार इगतपुरी / तलाठी वाळविहीर यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कस खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.\n11. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निर्बंध लागू राहतील\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा क.म)1961\nब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948\nक) महाराष्ट्र धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947\nड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी सुधारणा अधिनियमन 1974(1974/35)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधित नागरी जमीन (कमाल) मर्यादा विनियम अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी देणे जर आवशक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nवरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचे भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": ".रविंद्र रघुनाथ पवार"
}
