{
  "village_code": "272000130261740000",
  "village_name": "नांदूरशिंगोटे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:22Z",
  "surveys": [
    "758"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअधिकारी - अपर जिल्हाधिकारी, नाशिक\nआदेश क्रमांक - क्र.मशा/कक्ष/3/9/एस.आर/76/2025\nआदेश दिनांक - 21/10/2026\nमौजे नांदूरशिंगोटे ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ग. नं. 758 चे क्षेत्र 00 हे. 20 आर पो. ख. 00 हे. 06 आर असे एकुण क्षेत्र हे. 00 हे 26 आर, आकार रु. 0.05 पै. इतके क्षेत्र अर्जदार / जमीन भिमराव मेसू पठारे व इतर, रा.आंबेडकर नगर, मु. पो. नांदूरशिंगोटे, ता.सिन्नर जि. नाशिक यांनी नवीन शर्तीवर धारण केलेल्या भोगवटादार वर्ग -2 च्या शेतजमीनीस शासन अधिसूचना दि. 04/03/2025 अन्वये भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेकामी परवानगी मिळणेकामी विनंती अर्ज केलेला आहे. सदर प्रस्तावाबाबत तहसिलदार सिन्नर यांनी चौकशी करुन अहवाल सादर केलेला आहे. प्रस्तुत मिळकतीबाबत उप वनसंरक्षक, पश्चिम भाग, नाशिक यांनी त्यांचे कडील जावक क्र. अ/सव्र्व्हे/जमीन/819/सन 2020-21 दि. 26/08/2020 व उप वनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांनी त्याचेकडील जा.क्र.-3/जमीन /146/171/सन 2019-20 दि. 08/05/2020 व जा. क्र. कक्ष-3/जमीन/146/683/सन 2020-21 दि. 15/07/2020 रोजीच्या पत्रान्वये, मौजे नांदूरशिंगोटे ता. सिन्नर, जि. नाशिक येथील गट नं. 758 हा वनजमीन असलेबाबत दिसून येत नाही असे अभिप्राय कळविलेले आहे. सहायक नगर रचनाकार, सहायक संचालक, नगर रचना, नाशिक यांचेकडील पत्रान्वये, मंजूर प्रादेशिक योजना नाशिकच्या जिल्हा नकाशानुसार मौजे नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ग. नं. 758 ही जागा \"शेती\" विभागात समाविष्ट असल्याचा अहवाल दिलेला आहे. सह दुय्यम निबंधक सिन्नर 1 यांचेकडील दि. 16/06/2026 रोजीच्या मुल्यांकन दाखल्यानुसार, एकुण क्षेत्र है. 00.26 आर चे एकूण मुल्यांकन रक्कम रु. 13,51,400/- (अक्षरी रुपये तेरा लाख एक्कावन्न हजार चारशे मात्र) इतके कळविलेले आहे. सदरच्या मुल्यांकन रकमेच्या 25% रुपांतरण अधिमुल्याची (पुर्णांकात) रक्कम रु. 3,37,850/- (अक्षरी रुपये तीन लाख सदोतीस हजार आठशे पन्नास मात्र) इतकी रक्कम अर्जदार यांनी राष्ट्रीयकृत बँकेत 0029065201 या मुख्य लेखाशिर्षाखाली भरणा केले असलेबाबत तहसिलदार सिन्नर यांनी डिफेस चलनासह अहवाल सादर केलेला आहे.\nमा. अपर जिल्हाधिकारी नाशिक, यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार अर्जदार / जमीन मालक श्री. भिमराव मेसू पठारे व इतर, मु.पो. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर जि. नाशिक यांनी नवीन शर्तीवर धारण केलेली मौजे नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील ग. नं. 758 चे क्षेत्र 00 हे. 20 आर पो. ख. 00 हे. 06 आर असे एकुण क्षेत्र हे. 00 हे 26 आर, आकार रु. 0.05 पै. ह्या जमीनीस शासन अधिसूचना दि. 04/03/2025 मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग -2 मधुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे . सदर अटी व शर्तीची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात येत आहे.\nअटी व शर्ती :-\n1) अर्जदार / जमीन मालक भिमराव मेसू पठारे व इतर, रा. आंबेडकर नगर, मु. पो. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर जि. नाशिक हे सदरची जमिन भोगवटादार वर्ग-1 म्हणुन धारण करतील.\n2) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यांस अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे.\n3) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.\n4) प्रश्नाधिन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग -2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दि. 04/03/2025 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.\n5) सदर मिळकत बिनशेती करावयाची असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n6) नागरी जमिन (कमाल मर्यादा धारणा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.\n7) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होवु नये याची दक्षता घ्यावी.\n8) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधील तरतुदींचा भंग होवु नये याची दक्षता घ्यावी.\nहा आदेश महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-2 चे परिपत्रक क्र.3 मधील परिच्छेद 78 व शासन अधिसूचना दि. 04/03/2025 नुसार निर्गमित करण्यात येत असून सदर आदेशाने फेरफार नोंद दप्तरी घेतली असे.",
  "talathi": "सतीश दशरथ राठोड"
}
