{
  "village_code": "272000140262210000",
  "village_name": "नांदुर्डी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6087,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:57Z",
  "surveys": [
    "544/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/292/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nवाटप आदेश:- बाजुस दाखल मौजे नांदुर्डी येथिल ग.न. 544/3 क्षेत्र 1.09 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर आकार 5.18 या क्षेत्राचे तुकाराम पोपट देवकर व इतर सर्व यांनी कलम 85 अन्वये वाटणीपत्र कामी मा. तहसिलदार साहेब निफाड यांच्याकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे मा.तहसिलदार निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/292/2026 निफाड दिनांक 16/10/2026 अन्वये आपआपसात वाटप केले आहे ते खालील प्रमाणे.\n1) विश्वनाथ तुकाराम देवकर ग.नं. 544/3 क्षेत्र 0.5450 आकार 2.59 पो.ख. 0.0000\n2) सोमनाथ तुकाराम देवकर ग.नं. 544/3 क्षेत्र 0.5450 आकार 2.59 पो.ख. 0.0000\nतसेच गट नं. 544/3 मध्ये दोन विहिरी, शेततळे हे विश्वनाथ व सोमनाथ यांचा सामाईक हिस्सा राहील. मिळकतीत जाणेयेणेसाठी पूर्वपार वहिवाटी रस्ताने जाणेयेणेचे हक्कासह.\nयाप्रमाणे वरील क्षेत्राचे मा.तहसिलदार निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/292/2026 निफाड दिनांक 16/10/2026 या आदेशातील खालील अटी शर्तीस अधिन राहुन वाटप केले आहे .\n1)सदर जमिनीचा 7/12 उतारा वेगळा करण्यात येऊ नये.\n2)महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम खात्याचे वाटप नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमिनीवर इतर हक्कात जमिनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित जमिन धारकांवरच राहील.\n3)वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडयास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहीवाटदार एकत्रित व्हावयास पाहिजे.\n4)ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप नंतर सदर जमीन राहील.\n5)वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.\n6)वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकावर राहील.\n7)सदर शेतजमीनीतील पूर्वापार रस्त्यांची व इतर वहीवाट कायम राहील.\n8)सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदिस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.\n9)सदर जमीन वाटपामुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.\n10)सदर जमीन वाटपामुळे भूमीहिन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.\n11)सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख निफाड यांचेकडून रीतसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधन कारक राहील.\n12)सदर शेतजमीनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील. तसेच इतर अधिकारातील सर्व प्रकारचे बोजे कायम ठेवावेत.\n13)अर्जदार व संमती देणार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याचे सांगितले आहे.\n14)अर्जदार व संमती देणार यांनी सुनावणीस समक्ष हजर राहून वारसाबाबत दिलेल्या माहितीस ग्राह्य धरून वाटप आदेश पारित करण्यात येत आहे. परंतु अर्जदार यांनी वारसांची व त्यानुषंगीक माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने भविष्यात वाद उद्धवल्यास किवा न्यायालयात दावा दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील याची नोंद घ्यावी.\n15)मा. उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये प्रस्तुत आदेशाविरुद्ध दावा दाखल करून दाद मागता येईल.",
  "talathi": "संकेत अनिल मरवट"
}
