{
  "village_code": "272000150263910000",
  "village_name": "भिंगारे",
  "taluka_name": "येवला",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:43:19Z",
  "surveys": [
    "106",
    "150",
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, येवला यांच्या न्यायालयात दाखल नियमित दिवाणी दावा रे. मु. नं. ३६७/२०२५ (पांडुरंग रामनाथ गाडे विरुद्ध वच्छलाबाई रामनाथ गाडे व इतर) यामध्ये राष्ट्रीय लोक अदालत पॅनेल क्र. ३, येवला यांच्या समक्ष दिनांक १४/०३/२०२६ रोजी उभय पक्षांत आपसात तडजोड होऊन तडजोड पुरसीस (Exh. 13) अन्वये अंतिम लोक अदालत निवाडा (Award - Exh. 14) पारित झालेला आहे.\nसदर निवाड्यानुसार प्रतिवादी क्र. १ श्रीमती वच्छलाबाई रामनाथ गाडे (आई), प्रतिवादी क्र. ३ सौ. मंगल मारुती मोरे व प्रतिवादी क्र. ४ सौ. गंगुबाई कैलास लामखडे (बहिणी) यांनी मौजे भिंगारे येथील सर्व मिळकतींमधील आपला अविभक्त हक्क व हिस्सा विनामोबदला मुलगा/भाऊ श्री. पांडुरंग रामनाथ गाडे व श्री. ईश्वर रामनाथ गाडे यांच्या लाभात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nत्यानुसार लोक न्यायालयाच्या आदेशान्वये व उभयतांच्या संमतीनुसार मौजे भिंगारे येथील खालील मिळकतींचे वाटप प्रत्यक्ष कब्जा व चतुःसीमेप्रमाणे खालीलप्रमाणे नोंदविण्यात येत आहे:\n१) गट क्र. ८२/१: क्षेत्र (एकूण क्षेत्र ३ हे. ७४ आर पो.ख.0 हे १८ आर)\nअ) श्री. पांडुरंग रामनाथ गाडे (वादी) यांचे वाट्यास गेलेले क्षेत्र:\n- महालखेडे-भिंगारे रस्त्याचे पूर्वेकडील क्षेत्रातील पूर्वेकडून पहिला हिस्सा क्षेत्र ० हे. ८०.५० आर, आकार रु. २.८८\n- महालखेडे-भिंगारे रस्त्याचे पूर्वेकडील क्षेत्रातील पूर्वेकडून तिसरा हिस्सा क्षेत्र ० हे. ७१.५० आर + पो.ख. ० हे. ०९ आर, एकूण ० हे. ८०.५० आर, आकार रु. २.५५\n- महालखेडे-भिंगारे रस्त्याचे पश्चिमेकडील क्षेत्रातील पश्चिमेकडून दुसरा हिस्सा क्षेत्र ० हे. ३५ आर, आकार रु. १.२६\n(एकूण क्षेत्र १ हे. ८७ आर पो.ख.0 हे ०९ आर)\nब) श्री. ईश्वर रामनाथ गाडे (प्रतिवादी क्र. २) यांचे वाट्यास गेलेले क्षेत्र:\n- महालखेडे-भिंगारे रस्त्याचे पूर्वेकडील क्षेत्रातील पूर्वेकडून दुसरा हिस्सा क्षेत्र १ हे. ५२ आर + पो.ख. ० हे. ०९ आर, एकूण १ हे. ६१ आर, आकार रु. ५.४५\n- महालखेडे-भिंगारे रस्त्याचे पश्चिमेकडील क्षेत्रातील पश्चिमेकडून पहिला हिस्सा क्षेत्र ० हे. ३५ आर, आकार रु. १.२६\n(एकूण क्षेत्र १ हे. ८७ आर पो.ख.0 हे ०९ आर)\n* सामाईक हक्क: गट क्र. ८२/१ मधील पांडुरंग रामनाथ गाडे यांच्या वाटणीतील पहिल्या हिस्स्याच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या विहिरीमध्ये दोघांना प्रत्येकी १/२ (निम्मा) समान हिस्सा व वहिवाटीसाठी सामाईक गाडी रस्ता राहील.\n२) गट क्र. १०६ (खाते क्र. ४०१):\n- एकूण क्षेत्र ० हे. ४० आर, आकार रु. १.५० हे संपूर्ण क्षेत्र श्री. पांडुरंग रामनाथ गाडे यांचे वाट्यास आल्याने त्यांचे नावे स्वतंत्रपणे दाखल.\n३) गट क्र. १५०:\n- अ) श्री. पांडुरंग रामनाथ गाडे (वादी): पूर्व-पश्चिम बांधाच्या उत्तरेकडील हिस्सा क्षेत्र ० हे. २२ आर + पो.ख. ० हे. ०६ आर, एकूण ० हे. २८ आर, आकार रु. ०.७३\n- ब) श्री. ईश्वर रामनाथ गाडे (प्रतिवादी क्र. २): पूर्व-पश्चिम बांधाच्या दक्षिणेकडील हिस्सा क्षेत्र ० हे. २१ आर + पो.ख. ० हे. ०७ आर, एकूण ० हे. २८ आर, आकार रु. ०.६९\nसबब, मे. लोक न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मौजे भिंगारे येथील गट क्र. ८२/१, १०६ व १५० मधील मूळ सामाईक नोंदी कमी करून उपरोक्त वाटपाप्रमाणे श्री. पांडुरंग रामनाथ गाडे व श्री. ईश्वर रामनाथ गाडे यांची नावे हिस्सेनिहाय नोंदविण्यात येत आहेत. तसेच श्रीमती वच्छलाबाई रामनाथ गाडे, सौ. मंगल मारुती मोरे व सौ. गंगुबाई कैलास लामखडे यांनी हक्क सोडल्याने त्यांची नावे कमी करण्यात येत आहेत. सदर नोंद ही भूमी अभिलेख विभागाकडील पोटहिस्सा मोजणीच्या अधीन राहील.आदेश फाईलिस दाखल असे.",
  "talathi": "बापु रामसिंग पाटील"
}
