{
  "village_code": "272100070271030000",
  "village_name": "कोलवडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 439,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:18:06Z",
  "surveys": [
    "213/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट न. ची जमीन आज रोजी मे.रामश्याम टेक्स्टाईल इंड. ली.तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी श्री.मदन के.सरावगी यांच्या नावे दाखल आहे.सदर जमीन मालक यांनी या ग.न.ची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडे गहाण ठेवून दिनांक 14/09/2011 रोजी 572100000/- (अक्षरी सत्तावन कोटी एकवीस लाख रु.मात्र कर्ज घेतले होते.या कर्जाची परतफेड जमीन मालक यांना न करता आल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी सदर जमीन बाबत SARFAESI ACT 2002 नुसार कार्यवाही करून सदर जमीन बँकेने आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतली होती.या जमिनीबाबत दिनांक 10/08/2023 रोजी घेण्यात आलेल्या लिलावामध्ये श्री.दिनेश गोपीनाथ संखे यांनी सर्वाधिक बोली रक्कम रुपये 3,1600000(अक्षरी तीन कोटी सोळा लाख रु. मात्र ) जाहीर केल्याने सदर लिलावात त्यांनी सदर जमीन विकत घेतली आहे.या बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील दिनांक 12/09/2023 रोजीच्या पत्रानुसार श्री.दिनेश गोपीनाथ संखे यांना सदर जमीन विकत घेण्याबाबत विक्री प्रमाणपत्र पारित करण्यात आले आहे.या विक्री प्रमाणपत्राच्या आधारे सह दुय्यम निबंधक पालघर-1 यांचे कडील DEED OF CONFIRMATION OF CERTIFICATE OF SALE (विक्री प्रमाणपत्राचे मान्यता पत्र) दस्त क्रमांक 9917/2026 दिनांक 31/08/2026 नुसार दस्त नोंदणी झाले आहे.परंतु सदर जमीन हि भोगवटादार वर्ग-2 या भूधारणाप्रकारची असून मूळ जमीन मालक यांना “खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी” अधीन असलेल्या अटी व शर्तीवर शासनाद्वारे प्रदान करण्यात आली होती.हि जमीन खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापर करण्यासाठी\nमिळाली असल्याने या जमिनीचे हस्तांतरण करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/टे-1टेनंसी/कलम-63(1)अ/एसआर-02/2026 दिनांक 30/06/2026 रोजीच्या आदेशा नुसार या आदेशातील अटी व शर्ती क्र.1 ते 18 अधीन राहून या हस्तांतरणबाबत बाजार मूल्याच्या 25% हस्तांतरण आकार घेवून एकूण रक्कम रुपये 9407486/- (अक्षरी चौऱ्याणव लाख सात हजार चारशे शह्यांऐंशी मात्र) इतकी रक्कम चलन क्रमांक MH019826825202526P दिनांक 24/03/2026 अन्वये श्री.दिनेश गोपीनाथ संखे,संचालक श्री.स्वस्ती केम फार्मा प्रा.लि.मुंबई यांनी शासन जमा केल्याने हस्तांतरण करणेकामी परवानगी दिली आहे.या परवानगीनुसार जमीन विकत घेणार श्री.दिनेश गोपीनाथ संखे,संचालक श्री.स्वस्ती केम फार्मा प्रा.लि.मुंबई यांचे नावे खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनार्थ हा इतर अधिकारात नमूद असलेला शेरा व भोगवटादार वर्ग-2 कायम ठेवून 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केली आहे.",
  "talathi": "मोमीन जहीर नजीर"
}
