{
  "village_code": "272100070271520000",
  "village_name": "पडघे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:32:14Z",
  "surveys": [
    "106/1/106/2/प्लॉटनं/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nमौजे पडघे, ता. व जि. पालघर येथील गट क्रमांक 106/1/106/2/प्लॉटनं/7, क्षेत्र 14.00 आर.चौ.मी. या मिळकतीबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, मालमत्ता वसुली शाखा, मुंबई यांच्यामार्फत सुरक्षित कर्जाच्या वसुलीसाठी सुरक्षितताविषयक वित्तीय मालमत्तांचे प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभूती हिताची अंमलबजावणी अधिनियम, 2002 (SARFAESI Act, 2002) च्या तरतुदींनुसार सार्वजनिक ई-लिलावाची कार्यवाही करण्यात आल्याने सदर ई-लिलावामध्ये यशस्वी लिलाव खरेदीदार म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी श्री. संजीव वर्मा यांनी दिनांक 27/08/2026 रोजी विक्री प्रमाणपत्र निष्पादित केले आहे. सदर विक्री प्रमाणपत्र दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 13230 दिनांक 27/08/2026 अन्वये नोंदणीकृत आहे.\nसदर विक्री प्रमाणपत्रानुसार मिळकतीची लिलाव विक्रीची रक्कम रुपये 70,00,000/- (अक्षरी रुपये सत्तर लाख मात्र) आहे. विक्री प्रमाणपत्रामध्ये खरेदीदार म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स यांचे नाव नमूद असून, संबंधित नोंदणी दस्ताच्या सूची क्रमांक 2 मध्ये दस्त ऐवज करून देणार बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे संजीव वर्मा व दस्त ऐवज करून घेणार मेसर्स रुद्रा इम्पेक्स तर्फे 1) श्री. मीत निलेश गडा व 2) श्रीमती भावना निलेश गडा यांची नावे नमूद असून मोबदला रक्कम 1/- नमूद आहे.\nत्याअनुषंगाने, सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर पूर्वी खातेदार म्हणून नोंद असलेले श्री. अमित अशोक खामकर यांचे नाव कमी करून, विक्री प्रमाणपत्राच्या आधारे नवीन हक्कसंपादक म्हणून मेसर्स रुद्रा इम्पेक्स हे नाव 7/12 सदरी अधिकार अभिलेखात दाखल केले असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
