{
  "village_code": "272100080273820000",
  "village_name": "देवदळ",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:13:31Z",
  "surveys": [
    "5/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 मौजे देवदळ, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं. 5/अ या मिळकतीच्या ७/१२ सदरी श्रीमती ममता सत्येन कपाडिया यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल आहे. सदर खातेदार दि. 18/10/2022 रोजी मुंबई येथे मयत झाल्या आहेत.मयत खातेदार यांनी दि. 15/02/2022 रोजी आपले अंतिम मृत्युपत्र (Last Will and Testament) केले होते. सदर मृत्युपत्रास मा. उच्च न्यायालय, मुंबई (Testamentary and Intestate Jurisdiction) यांनी प्रोबेट याचिका क्र. 3790 सन 2023 (Will No. 1551 of 2023) मध्ये दि. 24/04/2024 रोजी प्रोबेट मंजूर केले असून, सदर प्रोबेट संपूर्ण भारतात अंमलात आहे. त्याद्वारे मृत्युपत्र सिद्ध व नोंदणीकृत झालेले आहे.सदर मृत्युपत्राच्या परिच्छेद क्र. 14 अन्वये मयत खातेदार यांनी \" सर्वे नं. 5/अ , गाव देवदळ, ता. वसई, जि. पालघर\" ही मिळकत श्री. सत्येन ज्योतींद्र कपाडिया,.यांना मृत्युपत्राद्वारे दिलेली आहे. प्रोबेटसोबत जोडलेल्या स्थावर मालमत्ता अनुसूची क्र. \"1\" मधील अनु. क्र. 2 येथेही सदर मिळकत नमूद आहे.त्याअनुषंगाने मयत श्रीमती ममता सत्येन कपाडिया यांचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरातून कमी करण्यात येत असून, त्याऐवजी मृत्युपत्र लाभार्थी श्री. सत्येन ज्योतींद्र कपाडिया, यांचे नाव सर्वे नं. 5/अ च्या ७/१२ सदरी कब्जेदार म्हणून दाखल करणेकामी सदरची नोंद मा. उच्च न्यायालय, मुंबई (Testamentary and Intestate Jurisdiction) यांनी प्रोबेट याचिका क्र. 3790 सन 2023 (Will No. 1551 of 2023) मध्ये दि. 24/04/2024 अन्वये केली असे.",
  "talathi": "दत्ता तुळशीराम डोईफोडे"
}
