{
  "village_code": "272100110276950000",
  "village_name": "पाल्हेरी",
  "taluka_name": "शहापुर",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 202,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:47Z",
  "surveys": [
    "32/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nतहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर ,यांचे कार्यालय जि.ठाणे यांसकडील क्र. कुळवहिवाट/कलम-43/एसआर नं. 65/2026 दिनांक:- 16/10/2026 शासन निर्णयान्वये \"सद्यस्थितीत, राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनिय, 1958, मराठवाड्यासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, 1950 व उर्वरित महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 लागू आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. मात्र, त्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम भरावी लागते. तथापि, सदर नजराण्याची रक्कम अत्यंत किरकोळ असल्यामुळे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास नजराणा भरणेबाबत नाहक त्रास होत असल्याने महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, २०२६ (दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.यानुसार मौजे पाल्हेरी येथील सर्वे नंबर 32/3/ब चे क्षेत्र 0.1110 हे.आर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत आहे. करून भोगवटादार वर्ग – 2 ऐवजी भोगवटादार वर्ग – 1 करून अधिकार अभिलेख (सातबारा) अद्ययावत करण्यात येत आहे.",
  "talathi": "रविंद्र काशिनाथ मेंगाळ"
}
