{
  "village_code": "272100124213300036",
  "village_name": "टिटवाळा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:45Z",
  "surveys": [
    "84/2",
    "85/1",
    "86",
    "87/3/ई",
    "87/3/ड",
    "88",
    "89/1/ड/1",
    "89/2",
    "92",
    "95/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/05/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे टिटवाळा १) स. नं. ८४/२ - रघु नागो भगत २) स.नं. ८५/१ - शंकर भाऊ भगत ३) स.नं. ८६ - रघु नागो भगत ४) स.नं. ८७/३/ई - शंकर भाऊ भगत ५) स.नं. ८७/३/ड - शंकर भाऊ भगत ६) स.नं ८८ - शंकर भाऊ भगत ७) स. नं. ८९/१/ड/१ - रघु नागो भगत ८) स. नं. ८९/२ - रघु नागो भगत ९) स. नं. ९२ - रघु नागो भगत १०) स.नं. ९५/१/ब - रघु नागो भगत आज रोजी यांचे नावे दाखल आहे.\nमा. अपर जिल्हाधिकारी ठाणे यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस/अपील/क्र.१३७/२०२५ दि. १३/०३/२०२६ प्राप्त झाला असून सदर आदेशातील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.\nमा. उपविभागीय अधिकारी यांनी पारित केलेले आदेश योग्य आहेत अगर कसे? हि बाब प्रस्तुत प्रकरणी निर्णयार्थ आहे.\nमौजे टिटवाळा ता. कल्याण, जि. ठाणे येथील दावा मिळकतीबाबत अभिलेखात नोंदविणेत आलेला फेरफार क्रमांक १०१९ व ११८४ या नोंदीविरुद्ध श्रीम. वनिता भास्कर भेरले उर्फ वनिता उर्फ वाळकी परशुराम भगत यांनी उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्यात उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक १५/५/२०२५ रोजीचे आदेशाने अपील मान्य केलेले आहे. उपविभागीय अधिकारी यांचे दिनांक १५/५/२०२५ चे आदेशाने व्यथित होवून अपिलार्थी यांनी प्रस्तुतचे अपील या न्यायालयात दाखल केलेले आहे.\nअपिलार्थी यांचा दावा आहे कि, दावा मिळकती ह्या रघुनाथ नागो भगत यांचे मिळकती आहेत. त्यांना कोणीही वारस नसलेने चुलत भावाचा मुलगा नकलू शंकर भगत यांना दत्तक घेतलेले आहे. रघुनाथ नागो भगत यांनी त्यांचे हिश्याला आलेल्या काही मिळकती जैतू शंकर भगत व चांगो शंकर भगत यांना स्वखुशीने दिलेल्या आहेत. त्याची नोंद फेरफार क्रमांक १०१९ ने झालेली आहे. नकलू रघुनाथ यांना वडिलोपार्जित शेतजमीन मिळालेल्या आहेत. दत्तक पत्र हे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे नोंदणीकृत केलेले आहे. सामनेवाले क्रमांक १ हे शंकर भाऊ भगत यांचे वारस आहेत. मिळकत कोणाला द्यायची याचा अधिकार रघुनाथ नागो भगत यांना आहे.\nसामनेवाले क्रमांक १ यांचे म्हणणे आहे कि, दावा मिळकतीमध्ये सामनेवाले क्रमांक १ यांचा अधिकार आहे. सदर मिळकती ह्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती आहेत. शंकर भाऊ भगत यांचे हिश्यास येणाऱ्या मिळकती वारस म्हणून सामनेवाले क्र.१ यांचे वडील परशुराम शंकर भगत यांच्या हिश्यास येणे आवश्यक आहे.अपिलार्थी नकलू रघुनाथ भगत यांना दत्तक घेतलेले दत्तकपत्र खोटे व बनावट असून ते सामनेवाले क्र. १ यांना मान्य नाही. सामनेवाले क्र. २ यांचे म्हणण्यानुसार दावा मिळकती त्यांनी जैतू शंकर भगत यांचे कडून विकत घेतलेल्या आहेत. रघुनाथ नागो भगत यांना कोणीही वारस नसलेने त्यांनी नकलू शंकर भगत यांना दत्तक घेतले.असून काही मिळकती जैतू शंकर व चांगो शंकर भगत यांना दिलेल्या आहेत. सामनेवाले क्र. ३ व ४ यांचे म्हणण्यानुसार दावा मिळकत त्यांनी जैतू शंकर भगत व सामनेवाले २ यांचेकडून विकत घेतलेली आहे. नकलू रघुनाथ भगत यांना दत्तकपत्र म्हणून वडिलोपार्जित प्राप्त झालेल्या आहेत. दत्तकपत्र हे नोंदणीकृत आहे. दावा मिळकतीशी सामनेवाले यांचा संबंध नाही.\nसंचीकेतील कागदपत्रे व अपिलार्थी तसेच सामनेवाले यांचे लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता प्रस्तुत प्रकरणी वाद हा वारस हक्काचा व नकलू रघुनाथ भगत यांचे दत्तकपत्राचा आहे. सामनेवाले क्र. १ दावा यांना दावामिळकती मध्ये वारसाहक्क प्राप्त होत असलेबाबत त्यांनी कायदेशीर पुरावे सादर केलेचे दिसून येत नाहीत. तसेच नकलू रघुनाथ भगत यांचे दत्तकपत्राचे अवलोकन करता सदरचे दत्तक पत्र हे नोंदणीकृत असून नोंदणीकृत दस्ताचे वैधते बाबत निर्णय घेणेचे अधिकार हे महसूल न्यायालयास नसून सदरचे अधिकार हे मा दिवाणी न्यायालयास आहेत. तसेच दावा मिळकतीबाबत नोंदणीकृत दास्ताने त्रयस्थ हितसंबंध निर्माण झालेले आहेत. सामनेवाले क्र. १ यांना सदरचे दत्तक पत्र मान्य नसल्यास त्यांनी त्या विरुद्ध योग्य त्या सक्षम न्यायालयात दाद मागणे उचित ठरेल.\nउपरोक्त बाबीचे अवलोकन न करता उपविभागीय अधिकारी यांनी पारित केलेले आदेश हे सदोष ठरत असलेने सदरचे आदेश रद्द करणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत मी आलो आहे, सबब मा. अपर जिल्हाधिकारी ठाणे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.\nआदेश –\n१) निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा अपील अर्ज मान्य करणेत येत आहे.\n२) उपविभागीय अधिकारी कल्याण विभाग कल्याण यांचेकडील आरटीएस कावी क्रमांक ५३/२०२३ दिनांक १५/०५/२०२५ रोजीचे आदेश रद्द करणेत येतात.\nवरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने मा. उपविभागीय अधिकारी कल्याण विभाग कल्याण यांचेकडील आरटीएस कावी क्रमांक ५३/२०२३ दिनांक १५/०५/२०२५ रोजीचा आदेश रद्द करणेत आल्याने १) स. नं. ८४/२ - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून जैतु शंकर भगत यांचे नाव दाखल केले असे.\n२) स.नं. ८५/१ - शंकर भाऊ भगत यांचे नाव कमी करून जैतु शंकर भगत यांचे नाव दाखल केले असे.\n३) स.नं. ८६ - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून नकलू रघुनाथ भगत यांचे नाव दाखल केले असे.\n४) स.नं. ८७/३/ई - शंकर भाऊ भगत यांचे नाव कमी करून जैतु शंकर भगत यांचे नाव दाखल केले असे.\n५) स.नं. ८७/३/ड - शंकर भाऊ भगत यांचे नाव कमी करून चांगो शंकर भगत यांचे नाव दाखल केले असे.\n६) स.नं ८८ - शंकर भाऊ भगत यांचे नाव कमी करून चांगो शंकर भगत यांचे नाव दाखल केले असे.\n७) स. नं. ८९/१/ड/१ - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून नकलू रघुनाथ भगत यांचे नाव दाखल केले असे.\n८) स. नं. ८९/२ - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून नकलू रघुनाथ भगत यांचे नाव दाखल केले असे.\n९) स. नं. ९२ - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून नकलू रघुनाथ भगत यांचे नाव दाखल केले असे.\n१०) स.नं. ९५/१/ब - रघु नागो भगत यांचे नाव कमी करून नकलू रघुनाथ भगत यांचे नाव दाखल केले असे.\nसदरची नोंद- मा. अपर जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/क्र.१३७/२०२५ दि. १३/०३/२०२६ अन्वये",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
