{
  "village_code": "272100150279820000",
  "village_name": "वाघिवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1524,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:11:43Z",
  "surveys": [
    "625"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. तहसिलदार मुरबाड यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये संक्षिप्त सुनावणी आयोजित करण्यात आली होती त्या अन्वये मौजे-वाघिवली येथील गट क्रमांक ६२५ क्षेत्र ०.८०.०० पो. ख ०.०१.०० आकार १.३१ ह्या ७/१२ वर क्रमांक/हक्कनोंद/संक्षिप्त क्र.८२/२०२६ दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या आदेशाचे विवेचन खालील प्रमाणे\nमौजे-वाघिवली, ता.मुरबाड, जि.ठाणे येथील ग.नं.६२५ क्षेत्र १.५६.०० हे.आर.प्र. पो.ख.०.०३.०० हे.आर.प्र आकार १.३१ या पैकी वाटप पत्रानुसार श्री. सचीन शांताराम विशे व इतर यांचे वाटणीस आलेल्या क्षेत्रावर श्री. बबन कृष्णा विशे यांचे चुकीने लागलेले नाव कमी करणेबाबत अर्जदार यांनी अर्ज केला आहे. तरी सदर अर्जाच्या अनुषंगाने तलाठी यांनी अहवाल सादर केला आहे. तरी प्रकरणी संक्षिप्त सुनावणी आयोजित करण्यात आली.\nप्रकरणी उपलब्ध अभिलेख तपासले असता सुची क्र २ अन्वये श्री. बबन कृष्णा विशे यांचे हिश्श्यास क्षेत्र ०.७५.० हे आर पो.ख. ०.०३.० हे आर व श्री. सचिन शांताराम विशे व इतर यांचे हिश्श्यास क्षेत्र ०.८१.० हे आर पो.ख. ०.०१.० हे आर असा दस्त क्र ५७९/२०२१ दि २३/०२/२०२१ अन्वये नोंदविलेच दिसून येते. परंतु गांव दप्तरी नोंदविण्यात आलेला फेरफार क्र १२५० पाहता श्री. बबन कृष्णा विशे यांना वाटणीपत्र दस्ताने प्रदान करण्यात आलेले क्षेत्र व श्री. सचिन शांताराम विशे व इतर यांना देण्यात आलेले क्षेत्र अशा दोन्ही ठिकाणी श्री. बबन कृष्णा विशे यांचे नाव लागल्याचे दिसून येते. श्री. बबन कृष्णा विशे यांनी सुनावणी दरम्यान त्याचे नाव कमी करण्यास हरकत नसल्याचे लेखी सादर केले आहे. तरी नोंदणीकृत वाटप पत्र दस्त क्र. ५७९/२०२१ दिनांक २३/०२/२०२१ नुसार दुरुस्ती करणे योग्य होईल. या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.\nएकंदरीत वरील विवेचन व कागदोपत्री पुरावे लक्षात घेता, मी, अभिजीत भाऊसाहेब देशमुख, तहसीलदार मुरबाड मला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १५० अन्वये प्राप्त अधिकाराने खालीलप्रमाणे आदेश पारीत केले १)अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे. २)मौजे-वाघिवली, ता.मुरबाड, जि.ठाणे येथील ग. क्र ६२५ वरील पत्रानुसार वाटणी क्षेत्र ०.८२.०० वरील श्री. बबन कृष्णा विशे यांचे नाव कमी करण्यात यावे.\nनोंद : मा. तहसिलदार मुरबाड यांचे कडील आदेश/क्रमांक/हक्कनोंद/संक्षिप्त क्र.८२/२०२६ दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या आदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "विशाल आनंदा साळवे"
}
