{
  "village_code": "272100150279950000",
  "village_name": "वांजळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 815,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:11:08Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. तहसिलदार मुरबाड यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये संक्षिप्त सुनावणी आयोजित करण्यात आली होती सदर सुनावणी मौजे-वांजळे येथील गट क्रमांक १०८ क्षेत्र ५८.००.०० आर चौ. मी आकार ५८०.०० ह्या बाबत होती. सदर सुनावणीचा निकाल त्यांचेकडील आदेश क्र/हक्कनोंद/संक्षिप्त क्र.१५९/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ अन्वये झाला आहे. सदर आदेशाचे विवेचन मध्ये पुढील प्रमाणे नमूद आहे.\nमौजे-वांजळे स.नं.१०८ येथे ५८०१ चौ.मी. ची जमीन मिळकत १६/०८/२००७ रोजी दस्त क्र.१२३८/२००७ रोजी झाला होता. दस्त नोंदणी झाल्यानंतर ७/१२ व फेरफार झाला त्यावेळेस जुन्या ७/१२ मधे मॅ. राजदिप लेदर्स प्रा.लि. तर्फे सौ. सिंधु शिवदास खंदारे यांच्या नावे झाला होता व तो बरोबर व योग्य होता. परंतु ऑनलाईन ७/१२ करतांना त्यात मे. राजदिप मोटर्स असे झाले आहे. यात दुरुस्ती करुन मे. राजदिप लेदर्स प्रा.लि.तर्फे सौ. सिंधु शिवदास खंदारे या नावाने दुरुस्त करुन मिळावी हि विनंती.\nअर्जदार यांचा अर्ज, सामनेवाले यांचे लेखी म्हणणे तसेच त्यासोबतची कागदपत्रे पाहता मी पुढीलप्रमाणे विवेचन करीत आहे –\nमौजे वांजळे, ता. मुरबाड, जि.ठाणे येथील ग.नं. १०८ क्षेत्र ५८.००.०० आर.चौ.मी. आकार ५८०.०० या ७/१२ सदरी नावांची दुरुस्ती करणेबाबत अर्जदार यांनी अर्ज केला आहे. तरी सदर अर्जाच्या अनुषंगाने तलाठी यांनी अहवाल सादर केला आहे. तरी प्रकरणी संक्षिप्त सुनावणी आयोजित करण्यात आली.\nमौजे वांजळे, ता. मुरबाड येथील सन 2009-10 चा हस्तलिखीत ७/१२ पाहता ग.क्र.१०८ क्षेत्र ५८.००.०० आर.चौ.मी या ७/१२ च्या भोगवटादार सदरी मे राजदीप लेदर्स प्रा लि तर्फे डायरेक्टर सिंधू शिवदास खंदारे असे नाव दिसून येत असून सदरचे नाव फेरफार क्र.३०६ ने नोंद घेतली आहे. परंतु हस्तलिखीत ७/१२ चे संगणीकृत करत असतांना खातेदाराचे नाव मे. राजदीप मोटर्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर सिंधू शिवदास खंदारे असे नाव दाखल केले गेले आहे. सबब खरेदीखत दस्त क्र.१२३८/२००७, फेरफार क्र. ३०६ व सन २००९-१० चा हस्तलिखीत ७/१२ अन्वये अर्जदार यांचे नाव संगणीकृत ७/१२ सदरी मे. राजदीप लेदर्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सिंधू शिवदास खंदारे असे दाखल होणे आवश्यक आहे.\nएकंदरीत वरील विवेचन, ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल व अभिलेख कागदोपत्री पुरावे लक्षात घेता, मी, अभिजीत भाऊसाहेब देशमुख, तहसीलदार मुरबाड मला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १५० अन्वये प्राप्त अधिकाराने खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.\n१) अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n२) मौजे-वांजळे, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील ग.नं.१०८ सदरी खरेदीखत दस्त क्र. १२३८/२००७, फेरफार क्र.३०६ व हस्तलिखीत ७/१२ प्रमाणे नावात \"मे. राजदीप लेदर्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सिंधू शिवदास खंदारे\" अशी दुरुस्ती करण्यात यावी.\nवरील प्रमाणे आदेश झालेने ७/१२ च्या भोगवटदार सदरी मे. राजदीप लेदर्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर सिंधु शिवदास खंदारे ऐवजी मे. राजदीप मोटर्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर सिंधु शिवराम खंदारे अशी दुरुस्ती केली असे.\nनोंद : मा. तहसिलदार मुरबाड यांचे कडील आदेश/क्रमांक/हक्कनोंद/संक्षिप्त क्र.१५९/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ रोजीच्या आदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "विजय शिवाजी माने"
}
