{
  "village_code": "272100150280740000",
  "village_name": "सोनावळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2828,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:49Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती यांचे आदेशाने बाजूस दाखल केलेल्या वनजमिनीच्या ग.नं वर शासन परिपत्रक क्र.एस १०/२०११/प्र.क्र.१७५/३ दि.०२/०१/२०१२ अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी(वन हक्क मान्य करणे) नियम २००६ च्या अंतर्गत सन २००८ नियमावलीनुसार पात्र दावेदारांच्या मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद होण्याबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती नुसार खालील शर्तींच्या व अटींच्या अधीन राहुन सदर दावेदारांच्या नोंदी मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील नमूद केलेल्या क्षेत्रासह ७/१२ च्या अभिलेखातील इतर हक्कात ठेवली असे. अटी व शर्ती खालील प्रमाणे १)वनअधिनियामच्या कलम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वापरासाठी असेल मात्र अन्य संक्राम्य किवा हस्तांतरीय नाही. २)विवाहित व्यक्तींच्या बाबतीत नवरा-बायको या दोघांच्याही नावाने संयुक्तपणे नोंद घ्यावी व एकाच व्यक्तीचे प्रमुख असलेल्या कुटुंबाच्या बाबतीत एकच प्रमुखाच्या नावाने नोंद करण्यात यावी व थेट वारस नसेल तर वारसाहक्क निकटतम नातेवाईकास देण्यात यावा. ३)सदर पट्ट्यावर बँक कर्ज घेता येईल व कर्जाची नोंद इतर हक्कात घेता येईल ४) ७/१२ अभिलेखात कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन (वने) अशी नोंद करावी. ५) वनहक्क मान्य दाव्यांच्या नोंदी ह्या म.ज.म अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार घेण्यात यावी. ६)शासन परीपत्राकामध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वनहक्क मान्य झालेल्या दाव्यांच्या नोंदी सदर जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात घेण्यात याव्या. ७)सदरचे शासन परिपत्रक महसुल विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. या अनुषंगाने मंजूर दाव्याच्या पुढील प्रमाणे नोंदी 7/12 सदरी घेण्यात येत आहेत.\nश्री. मधुकर रघुनाथ वाघेरे व श्रीमती. वनिता मधुकर वाघेरे. क्षेत्र. ०-८२-० हे. आर.",
  "talathi": "तन्मय अशोक पोटे"
}
