{
  "village_code": "272100150281700000",
  "village_name": "उचले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1130,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:17:07Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/कावि/७१८/२०२६\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमौजे उचले येथील सर्व्हे क्रमांक ३५८ (जुना सर्व्हे क्र. ७२/७) या बाबत ३२ म चा इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत श्री. रहीम हुसेन पटेल यांनी अर्ज सादर केला आहे. त्यानुसार संबधित लेजर क्रमांक ५७/१७० ची पडताळणी केली असता खालील तक्त्यात नमुद जमीन कुळकायद्यान्वये ३२ ग आदेश क्रमांक १६७८ दिनांक ३०/०५/१९६३ अन्वये सखाराम मालु पाटील चौधरी यांना मिळाली असल्याचे दिसुन येते. सदर जमीनीवरील कुळखरेदीचा बोजा रक्कम रुपये १०२२.५३/- (अक्षरी एक हजार बावीस रुपये त्रेपन्न पैसे मात्र) व त्यावरील व्याज जमीन मालक वाडिलाल गुलाबचंद शहा यांचा बोजा १७/०१/१९७४ रोजी शासन (पी. एल. ए. खात्यात) जमा केलेला असुन त्यानुसार या कार्यालयाकडून त्यांना त्यावेळी ३२ म प्रमाणपत्र दिनांक २५/०८/१९७७ निर्गमित केल्याचे दिसुन येते. सद्यस्थितीत ७/१२ चे इतर हक्क सदरी जमीन मालक यांचा बोजा दिसून येत आहे. ३२ म खरेदी प्रमाणपत्र निर्गमित असल्यामुळे, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधील तरतुदी प्रमाणे व मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि/ ७१८/२०२६,दिनांक ३०/१०/२०२६ नुसार अधिकार अभिलेखाच्या नियमाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्कातील, जमीन मालक यांचा बोजा कमी करणेची कार्यवाही केली असे.\n(नोंद. मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि/ ७१८/२०२६,दिनांक ३०/१०/२०२६ नुसार)",
  "talathi": "प्रशांत पंढरीनाथ खाकर"
}
