{
  "village_code": "272200010000001900",
  "village_name": "विलेपार्ले",
  "taluka_name": "अंधेरी",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 13407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:08:54Z",
  "surveys": [
    "63/अ/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस दाखल असलेल्या सर्वे नं. ची मिळकत आजरोजी गांव अभिलेखात 7/12 कब्जेदार सदरी सर्वे क्र. 63/अ/8, क्षेत्र 0.02.02 हे.आर.चौ.मी करिता 1) श्रीनिवास माधव देशपांडे, 2) दिलीप माधव देशपांडे, 3) नयना अशोक मुळे, 4) रविंद्र माधव देशपांडे, 5) अनुराधा एकनाथ देव व 6) श्याम विनायक मोघे यांचे नाव दाखल आहेत.\nअ.क्र. 1 वरील श्री. श्रीनिवास माधव देशपांडे यांचे दि. 27/09/2019 रोजी निधन झाले आहे. तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती सुभलक्ष्मी श्रीनिवास देशपांडे यांचे दि. 16/09/2005 रोजी निधन झाले आहे. त्यांना कोणतेही अपत्य नसल्याने श्रीनिवास माधव देशपांडे यांच्या पश्चात 1) श्री. रविंद्र माधव देशपांडे – भाऊ, 2) श्रीमती नयना अशोक मुळे – बहीण व 3) श्री. दिलीप माधव देशपांडे – भाऊ हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. त्यानुसार, कै. श्रीनिवास माधव देशपांडे यांचा सदर मिळकतीतील हिस्सा उपरोक्त वारसांना समान व अविभाजित प्रमाणात प्राप्त झाला आहे.\nकै. श्रीनिवास माधव देशपांडे यांच्या निधनानंतर अ.क्र.2) श्री. दिलीप माधव देशपांडे यांनी त्यांच्या मिळकतीबाबत Letters of Administration मिळण्यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे Testamentary Petition No. 3437 of 2021 दाखल केली होती. सदर याचिका प्रलंबित असताना श्री. दिलीप माधव देशपांडे यांचे दि. 14/04/2021 रोजी निधन झाले. कै. दिलीप माधव देशपांडे यांच्या दि. 15/06/2017 रोजीच्या इच्छापत्रानुसार तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि. 18/12/2023 रोजी जारी केलेल्या Letters of Administration नुसार त्यांचे पुत्र श्री. आदिश दिलीप देशपांडे यांना कै. दिलीप माधव देशपांडे यांच्या मिळकतीचा एकमेव लाभार्थी (Sole Beneficiary) घोषित करण्यात आले आहे.\nतसेच अ.क्र. 3 वरील श्रीमती नयना अशोक मुळे यांचे कोणतेही इच्छापत्र न करता (Intestate) दि. 10/05/2021 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात 1) श्री. राहुल अशोक मुळे – मुलगा व 2) श्री. हर्षल अशोक मुळे – मुलगा हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत.\nतसेच अ.क्र. 6 वरील श्री. श्याम विनायक मोघे यांचे कोणतेही इच्छापत्र न करता दि. 24/03/2022 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात 1) श्रीमती लीना श्याम मोघे – पत्नी व 2) श्री. चैतन्य श्याम मोघे – मुलगा हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत.\nत्यामुळे सदर मिळकतीच्या अनुषंगाने 1) श्री. रविंद्र माधव देशपांडे, 2) श्री. राहुल अशोक मुळे, 3) श्री. हर्षल अशोक मुळे, 4) श्री. आदिश दिलीप देशपांडे, 5) श्रीमती अनुराधा एकनाथ देव, 6) श्रीमती लीना श्याम मोघे व 7) श्री. चैतन्य श्याम मोघे अशी संबंधित हक्कदार/कायदेशीर वारसांची नावे असून, यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणताही कायदेशीर वारस नाही.\nत्यानुसार वरीलप्रमाणे वारस असून नोंद घेण्याकरिता सदरची नोंद घेण्यात आली.\n(नोंद- अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्यूप्रमाणपत्र, क्षतीपुर्ती बंधपत्र व इतर कागदपत्रांवरून नोंद केली असे)",
  "talathi": "किरण सुरेश ठबे"
}
