{
  "village_code": "272400020282780000",
  "village_name": "खानाव",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:22:47Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्‍या जमिन मिळकतीबाबत महाराष्‍ट्र कुळ वहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ओ, प्रमाणे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पनवेल यांचे न्‍यायालयातील 32 ओ दावा क्र-टेनन्सी/एसआर/23-2026 दि.01/10/2026 अन्वये पुढीलप्रमाणे निर्णय देण्‍यात आला आहे.\n1.अर्जदार यांनी दिनांक 25/06/2026 रोजी दाखल केलेला अर्ज मान्य करण्यांत येत आहे.\n2.दावा मिळकतीच्या इतर हक्कांत जमिनमालक /सामनेवाले क्र.1 ते 5 यांचे नावे कुळकायदा कलम 32ओ, प्रमाणे बोजा घेणार म्हणुन नोंदविण्यात यावे.\n3.दावा जमिनीची संपुर्ण रक्कम रु.1345/- भरल्यानंतर कुळकायदा कलम 32म प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.\n4.सदर जमिन कुळ हे उक्त अधिनियमाच्या कुळकायदा कलम 43 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण करतील.\nसदरची नोंद मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण पनवेल यांचे न्‍यायालयातील 32 ओ दावा क्र-टेनन्सी/एसआर/23-2026 दि.01/10/2026 अन्वये करण्यात आली.",
  "talathi": "अर्चना लक्ष्‍मण लोहकरे"
}
