{
  "village_code": "272400050287570000",
  "village_name": "सोनखार",
  "taluka_name": "पेण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4330,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:41:25Z",
  "surveys": [
    "43/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कात-२/२०२६/३६०१\nआदेश दिनांक : 24/10/2026\nमौजे सोनखार, ता. पेण येथील स. नं./ हि. नं. ४३/३ - एकूण क्षेत्र १.३९.४० हे. आर, आकार १८.४४ रु. पे. या मिळकतीच्या भोगवटादार सदरी विठोबा दत्तु म्हात्रे यांचे नाव दाखल असुन इतर अधिकारात ज. मा. विधवा विक्री तहकूब हा शेरा दाखल आहे. सदरचा शेरा फेरफार क्र. १८९३, दि. ०१/१२/१९७२ अन्वये दाखल झाल्याचे दिसुन येत आहे. त्याअनुषंगाने फेरफार क्र. २०६, दि. २७/०४/१९२३ पाहता काशा सखाराम पाटील यांनी स. नं./ हि. नं. ४३/३ ही मिळकत गणपत तुकाराम पाटील व झांबरबाई औ. गणपत पाटील यांचेकडुन फरोक्तने घेतल्याचे दिसुन येत आहे. तदनंतर फेरफार क्र. ५७०, दि. १२/०८/१९४८ पाहता उपरोक्त मिळकतीस दत्तात्रय बाळु म्हात्रे यांचे नाव संरक्षित कुळ म्हणून दाखल झालेले आहे. तदनंतर फेरफार क्र. ९९४A, दिनांक ०१/०१/१९५७ अन्वये संरक्षित कुळ म्हणून नाव दाखल झालेले दिसुन येते. तदनंतर फेरफार क्र. १९३४, दि. ०१/०२/१९७३ अन्वये ३२ ग ची किंमत भरली गेली आहे. या फेरफारप्रमाणे मे. शेतजमीन न्यायाधिकरण सो. पेण यांचेकडील हु. नं. ३२०७, दिनांक ११/०१/१९७३ प्रमाणे जमीन मालक झांबरबाई गणपत पाटील यांचा कुळ दत्तु बाळु म्हात्रे यांनी खरेदी किंमतीचा बोजा भरला आहे. त्यामुळे अर्जदार यांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मौजे सोनखार, ता. पेण येथील स. नं./ हि. नं. ४३/३ या मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला \"ज. मा. विधवा विक्री तहकूब\" हा शेरा मा.तहसीलदार पेण यांचा दि.२४/१०/२०२६ रोजीच्या क्र.हक्कनोंद/कात-२/२०२६/३६०१ सदर आदेशाने कमी केला आहे.",
  "talathi": "गोपाल भगवान बगाडे"
}
