{
  "village_code": "272500070310870000",
  "village_name": "तळेरानवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3771,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:56:00Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.तहसिलदार सो. अपर तहसिलकार्यालय लोणी काळभोर यांच्या कडील पत्र जा.क्र.हनो/कावि/२९०५/२०२६ दि.१९/१०/२०२६ नुसार मे डिस्ट्रिक्ट जज सो यांच्या कोर्टातील सी. अ. नं 28/2014 या दाव्यामध्ये सुदाम मारुती आव्हाळे विरुद्ध सिंधुबाई कांताराम ढेरंगे वगेरे या दाव्यात २७/०१/२०१५ रोजी तडजोड आदेश नोंदि साठी प्राप्त झाला.मोजे तळेरानवाडी येथील गट नंबर 361 मध्ये मारुती बोल्हू आव्हळे यांचे नाव दाखल आहे व आदेशातील EX.18 मध्ये रेस्पांण्डंट नं.१ सिंधुबाई कांताराम ढेरंगे यांना इतर रेस्पांण्डंट हेच वारसदार असल्याचे तड्जोड पत्रात नमुद आहे.त्यामुळे सिंधुबाई कांताराम ढेरंगे यांचे नाव आपिला मधुन कमी केले आहे.\nमारुती बोल्हु आव्हाळे हे दिनांक 24/5/2002 रोजी मयत झाले त्यांच्या वारसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यांचे कायदेशीर वारस खालील प्रमाणे सुदाम मारुती आव्हाळे,सुगंधाबाई मारुती गायकवाड,फुलाबाई बबन कुंजीर,विमल काशिनाथ भालसिंग.\nत्यांच्या वारसांनी दिनांक 27 /1/2015 रोजी नोंदणीकृत रिलिज डिड (हक्कसोड पत्र) सह.दु. नि कार्या. हवेली ७ दस्त क्र. १६७०/२०१५ करून दिल्याप्रमाणे तीन बहिणींनी सुदाम मारुती आव्हाळे यांना पूर्ण हिस्सा दिला आहे\nसदर दस्त व दिवाणी न्यायालयाच्या आदेशाबाबत सुदाम मारुती आव्हाळे हे मयत असल्याने त्यांचा मुलगा भानुदास सुदाम आव्हाळे यांनी कोणत्याही न्यायालयात सदर आदेशाला आव्हानीत केले नाही असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. मे डिस्ट्रिक्ट जज सो यांच्या कोर्टातील सी. अ. नं 28/2014 मधिल आदेश व मा.तहसिलदार सो. अपर तहसिलकार्यालय लोणी काळभोर यांच्या कडील पत्र जा.क्र.हनो/कावि/२९०५/२०२६ नुसार व नोंदणीकृत रिलिज डिड (हक्कसोड पत्र)सह.दु. नि कार्या. हवेली ७ दस्त क्र. १६७०/२०१५ नुसार मारुती बोल्हु आव्हाळे यांचे नाव कमी करुन सुदाम मारुती आव्हाळे यांचे नाव 7/12 वर दाखल केले असे.सर्व आदेश व कागदपत्र फायलिस दाखल असे.",
  "talathi": "शुभम राजेश वाबळे"
}
