{
  "village_code": "272500100312820000",
  "village_name": "वनपुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:03Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोदीचा प्रकार:- करारनामा\nलिहुन देणार:-\nतनवीर उर्फ तन्वीर कय्युम शेख रा.इंदिरानगर, हिंगणेमळा रोड, मंत्री निवास जवळे सर्व्हे नं.312, इंडस्ट्रियल एरिया हडपसर, पुणे पिन कोड-411028(खाता क्रमांक1077) यांचे मौजे वनपुरी, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट/सर्व्हे क्रमांक68, लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीपैकी लिहुन देणार यांचे मालकी ताबे वहिवाटीचे स्वतंत्र हिश्याचे बागायत लागवडीलायक 0.11 हे.आर संपुर्ण क्षेत्रापैकी 0.05 हे.आर क्षेत्रामधुन गट नंबर 72 चे मालक लिहून घेणार व गटातील इतर सर्व सहहिस्सेदार यांचेसाठी लिहून घेणार यांचे नावे गट नंबर 68 च्या पश्चिमेकडुन पुर्वेकडील क्षेत्रामध्ये जाणेयेणेकरीता 40 फुट रुंद व 128 फुट लांब क्षेत्र रस्त्यासाठी लिहून घेणार यांना गट नंबर 72 या शेतजमीन मिळकतीत पुर्व पश्चिम चालीचे उत्तर बाजुकडून लगतचा जाणेयेणेसाठी व वापर वहीवाटीसाठी विनामोबदला दिलेला असुन, सदर रस्त्याने जाणेयेणेचे व वापर वहीवाटीचे हक्कांसह दरोबस्त मिळकत त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय रंगनाथ कुंभारकर रा.ए-10, अरण्येश्वर पार्क, सहकारनगर, अरण्येश्वर मंदिराजवळ, पुणे. (खाता क्रमांक :-1236) यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील करारनामा दस्त क्रमांक 7279 दिनांक 10/06/2026 प्रमाणे विनामोबदला करारनामा करुन दिला असे. सबब करारनाम्यानुसार गट नंबर 68 मधुन गट नंबर 72 मधील संजय रंगनाथ कुंभारकर व गटातील इतर सर्व सहहिस्सेदार यांचेसाठी जाणेयेणेकरीता 40 फुट रुंद व 128 फुट लांब क्षेत्राचा रस्ता जाणेयणेचा हक्क अशी इतर हक्कात नोंद केली असे.",
  "talathi": "राजेश ज्ञानदेव दिवटे"
}
