{
  "village_code": "272600020322250000",
  "village_name": "वडगांव लांडगा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:45Z",
  "surveys": [
    "1099"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 636/2026 दि.24/08/2026 अन्वये वादी अलका रावसाहेब सदाकाळ, प्र.वादी नं. 1] रामदास भिवा सदाकाळ, 2] मिराबाई बजरंग वैदय, 3] सुमन झुंबर गडाख, 4] शोभा रावसाहेब सदाकाळ, 5] अंकुश रावसाहेब सदाकाळ, 6] दिनेश रावसाहेब सदाकाळ, 7] पर्बत रावसाहेब सदाकाळ, 8] विश्वास रावसाहेब सदाकाळ, 9] अशोक रामभाऊ आंबरे, 10] अशोक पुंजा आंबरे, 11] पार्वताबाई रामनाथ एखंडे च्यामध्ये दि. 04/09/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1] वादी अलका रावसाहेब सदाकाळ, प्र.वादी नं. 5] अंकुश रावसाहेब सदाकाळ, प्र.वादी नं.6] दिनेश रावसाहेब सदाकाळ यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे वडगाव लांडगा. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 1099 पैकी क्षेत्र 0.40.25 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.03.75 हे.आर चौ.मी. आकार 0.56 रु.पैसे दक्षीणेकडील व पश्चीम कोप-यातील पुर्वेकडील दुसरी वाटणी.\n2] प्र.वादी नं.1 रामदास भिवा सदाकाळ यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे वडगाव लांडगा. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 1099 पैकी क्षेत्र 0.79.50 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.07.50 हे.आर चौ.मी. आकार 1.11 रु.पैसे पुर्व उत्तर वाटणी.\n3] प्र.वादी नं.4 शोभा रावसाहेब सदाकाळ, प्र.वादी नं. 7] पर्बत रावसाहेब सदाकाळ, प्र.वादी नं.8] विश्वास रावसाहेब सदाकाळ यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे वडगाव लांडगा. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 1099 पैकी क्षेत्र 0.39.25 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.03.75 हे.आर चौ.मी. आकार 0.56 रु.पैसे उत्तरेकडुन दुसरी वाटणी व दक्षिणेकडुन तिसरी वाटणी.\nगट नं.1099 मध्ये एक सामाईक विहीर असुन सदर विहीरीत वादी व प्र.वादी यांचा दोघांचा मिळुन सामाईक 1/2 हिस्सा आहे. उर्वरित 1/2 हिस्सा हा मुळ पुरुष भिवाचा भाऊ शिवराम यांचे फांदीचा 1/2 हिस्सा आहे. सदर विहीरीवरुन वादी व प्र.वादी यांची स्वतंत्र पाईपलाईन असुन वादी व प्र.वादी नं. 1 व 4 यांनी त्यांचे हिश्याप्रमाणे पाणी वापर करावयाचा आहे. त्याबददल वादी व प्रवादी यांची काहीएक तक्रार नाही. तसेच वादीचे वाटपास आलेल्या क्षेत्रातुन पश्चीम बाजुने दक्षीण उत्तर रस्ता प्र.वादी नं. 4 हीस तिचे वाटपाचे क्षेत्रात वहिवाट करण्याकरिता बैलगाडी जाण्यायेण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे. त्याबददल वादी व प्र.वादी यांची काहीएक हरकत नाही. वादी व प्र.वादी यांचे प्रत्यक्ष वाटपानुसार आलेले क्षेत्र वांगेफोड पदधतीने असल्यामुळे त्याकामी कच्चा हात नकाशा जोडलेला आहे तो या तडजोडीचा भाग आहे. तसेच मयत भिवा हयाची मयत सावित्राबाई ही बहीण होती. तिचा कायदेशीर वारस मुलगा प्रवादी नं. 9 आहे. तसेच मयत भिवाची दुसरी बहीण शेवंताबाई होती. ती मयत असुन तीला प्र.वादी नं. 10 अशोक हा मुलगा व प्र.वादी नं. 11 पार्वताबाई असे दोन वारस आहेत. त्यांनी देखील मयत शेवंताबाईचा असलेला अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी यांचेकरिता विनामोबदला सोडुन दिलेला आहे. मयत भिवाची मुलगी प्र.वादी नं. 2 मिराबाई व प्र.वादी नं.3 सुमन हया आहेत. प्र.वादी नं. 9 यांनी त्यांच्या आईचा असलेला वडीलोपार्जित मिळकतीत हिस्सा त्यांचे आईचे भावाची मुले रावसाहेब मयत व रामदास प्र.वादी नं.1 यांना विनामोबदला सोडुन दिलेला आहे. तसेच प्र.वादी नं.2 मिराबाई व प्र.वादी नं.3 सुमन हयांनी त्यांचा वडीलोपार्जित मिळकतीमधील असलेला हिस्सा व हक्क विनामोबदला त्यांचे भाऊ मयत रावसाहेब व प्र.वादी नं.1 यांच्यासाठी सोडुन दिलेला आहे. त्यामुळे प्र.वादी नं. 2, 3 व 9 यांना दावा मिळकतीमध्ये हिस्सा घ्यावयाचा नाही.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 636/2026 दि.24/08/2026 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2402/2026 दिनांक 01/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अजय हरिभाऊ वाकचौरे"
}
