{
  "village_code": "272600050324700000",
  "village_name": "माळेवाडी",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:05:48Z",
  "surveys": [
    "78/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nमौजे माळेवाडी ता. श्रीरामपूर येथील गट क्रमांक ७८/२ (क्षेत्र ० हे. ९९ आर पो.ख. ० हे. ०२ आर) ही जमीन सीलिंग वाटपातील नवीन व शर्थीची असून सदर जमीन ज्ञानदेव बाबुराव गायकवाड हे भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करीत आहेत.\nअर्जदार ज्ञानदेव बाबुराव गायकवाड यांनी सदर जमिनीचे कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण होण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ चे कलम २७ व २९ मधील तरतुदीनुसार आणि शासन नियमांनुसार निश्चित केलेली २५% नजराणा रक्कम रु. २१०५८५/- (अक्षरी दोन लाख दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये) शासन जमा झाल्याची खात्री करून सदर जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्यास मंजुरी दिली आहे.\nत्यावरून मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेश क्र. कावि/एस.आर/१७२/२०२६ दि. २७/१०/२०२६ नुसार खालीलप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात येत आहे:\n१. मौजे माळेवाडी येथील गट क्र. ७८/२ मधील क्षेत्र ० हे. ९९ आर व पो.ख. ० हे. ०२ आर या जमिनीचा भोगवटादार वर्ग वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ असा करण्यात यावा.\n२. अधिकार अभिलेखातील (७/१२ उतारा) इतर हक्क आणि भोगवटादार सदर असणारा नवीन शर्त / सीलिंग वाटप / हस्तांतरास बंदी असा शेरा किंवा नोंद रद्द करण्यात यावी.\n३. सदर मंजुरी ही मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहील.\nमा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या आदेश क्र. कावि/एस.आर/१७२/२०२६ दि. २७/१०/२०२६ नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "अलका अर्जुन सरगय्ये"
}
