{
  "village_code": "272600060325740000",
  "village_name": "पाथरवाले",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6297,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:47:41Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनेवासा येथील मे सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी.यांचेकडील रे मु.52/2025 वादी –सुरेश एकनाथ खाटिक प्रतिवादी 1)एकनाथ हंसराज खाटिक प्रतिवादी 2)सुनंदा एकनाथ खाटिक प्रतिवादी 3)आशा अनिल मते प्रतिवादी 4)उषा संतोष आरगडे यांच्यामध्ये सुलेनामा झालेला आहे तो पुढीलप्रमाणे- वादी सुरेश एकनाथ खाटिक यास या वाटपामध्ये दावा मिळकत मौजे पाथरवाला ता.नेवासा जि.अहिल्यानगर येथील गट नं.31पैकी क्षेत्र ० हे 79 आर, यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पुर्व बाजूचे क्षेत्र 0 हे 39 आर या वाटपाणे मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी नं १ एकनाथ हंसराज खाटीक यास या वाटपा मध्ये दावा मिळकत मौजे पाथरवाला ता नेवासा जि.अ.नगर येथील गट नंबर ३१ क्षेत्र ० हे ७९ आर यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिम बाजुचे क्षेत्र 0 हे 40 आर या वाटपाने मालकी हक्कांने प्रत्यक्ष कब्जात देण्यात आलेले आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे.प्रतिवादी नं २ सुनंदा एकनाथ खाटीक ही प्रतिवादी नं १ ची पत्नी असून वादीची आई आहे प्रतिवादी नं २ हिने तिचा दावा मिळकती मधील हिस्सा हा आपला मुलगा वादी व पती प्रतिवादी नं १ यांचे हक्कांत सोडुन दिलेला आहे प्रतिवादी नं २ हिस दावा मिळकती मध्ये कुठल्याही प्रकारचा हिस्सा घ्यावयाचा नाही हे उभयतांना मान्य व कबुल आहे.प्रतिवादी नं ३ आशा अनिल मते व प्रतिवादी नं ४ उषा संतोष आरगडे हया वादीच्या बहीणी असुन प्रतिवादी नं १ व २ यांच्या मुली आहेत.प्रतिवादी नं ३ व ४ यांची लग्न झालेली असुन त्या पती कडे आनंदाने व सुखाने नांदत आहेत.प्रतिवादी नं ३ व ४ यांनी त्यांचा दावा मिळकती मधील हिस्सा हा आपला भाऊ वादी व वडील प्रतिवादी नं १ यांचे हक्कांत सोडुन दिलेला आहे. प्रतिवादी नं ३ व ४ यांची चोळी बांगडी सणवार इत्यादीचा खर्च हा वादी करणार आहे हे प्रतिवादी नं ३ व ४ यांना मान्य आहे.अर्ज व कलम 89(अ)अन्वये फायलिंग सुची क्र.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र.262/2025 दिनांक 24/07/2025 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
