{
  "village_code": "272600070326580000",
  "village_name": "आखतवाडे",
  "taluka_name": "शेवगाव",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:47:33Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nसिव्हील जज्ज साहेब शेवगाव, यांचेकडील रे.मु.नं.400/2024 दि 07/05/2026 नुसार\nवादी : दत्तात्रय मोहन यादव\nप्रतीवादी :- 1) भाऊसाहेब मोहन यादव 2) शिवनाथ नारायण साबळे(मयत) 2अ) अलका शिवनाथ साबळे 2ब) भोलेश्वर शिवनाथ साबळे 2क) शुभांगी वैभव करडक 2ड) विद्या सचिन जगदाळे यांचेत सुलेनामा होऊन वाटप झाले ते पुढीलप्रमाणे\n१)दावा कलम १अ मध्ये नमूद केलेली मौजे अखतवाडे ता. शेवगांव येथील शेतजमीन मिळकत गट नं. २५१ असा असून याचे क्षेत्र ० हे ९० आर या क्षेत्रामध्ये पूर्व-पश्चिम असा एक बांध टाकून दोन वाटण्या करण्यात आल्या. त्यापैकी उत्तरेकडील पहिली वाटणी त्याचे क्षेत्र ०० हे ४५ आर क्षेत्र हे प्रतिवादी नं. १ भाऊसाहेब मोहन यादव यांना देण्याचे ठरले आहे व त्याप्रमाणे प्रत्यक्ष ताब्यात दिले आहे. तसेच उर्वरित दक्षिणेकडील दुसरी वाटणी त्याचे क्षेत्र ०० हे ४५ आर वादी दत्तात्रय मोहन यादव यांस देण्याचे ठरले आहे व त्याप्रमाणे प्रत्यक्ष ताब्यात दिले आहे. त्याबाबत काहीएक तक्रार राहिलेली नाही. त्याचप्रमाणे सदर क्षेत्रामध्ये एक पाण्याचा बोर आहे तो वादी व प्रतिवादी नं. १ यांच्यामध्ये समान हिश्श्यात वापरण्याचे ठरले आहे.\n२) तसेच सदर दाव्यातील प्रतिवादी नं. २ अ अलका शिवनाथ साबळे, प्रतिवादी नं. २ ब भालेश्वर शिवनाथ साबळे, प्रतिवादी नं. २ क शुभांगी वैभव करडक, प्रतिवादी नं. २ ड विद्या सचिन जगदाळे यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील असलेला हिस्सा वादी दत्तात्रय मोहन यादव व प्रतिवादी नं. १ भाऊसाहेब मोहन यादव करिता सोडून दिलेला आहे.\nयेणेप्रमाणे वाटप झाले असून मे सिव्हील जज्ज साहेब शेवगाव यांचेकडील रे.मु.नं. 400/2024 दि 07/05/2026 नुसार व सह दुय्यम निबंधक शेवगांव यांचेकडील सूचीवरून नोद घेतली असे\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सोमनाथ प्रकाश आमने"
}
