{
  "village_code": "272700010337100000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13659,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:48:07Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 2025/भुसूवि/इनाम/सुनंदा-गर्जे/कावि-871/65\nआदेश दिनांक : 16/10/2026\nश्री सुनंदा नामदेव गर्जे, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांनी त्यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 36 मधील क्षेत्र 0.07.05 हे.आर. चोमी इनाम जमीन क्षेत्र भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करून मिळणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचेकडे अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार आष्टी यांनी सादर केलेला अहवालानुसार सदर इनाम जमीन ही मदतमाश प्रकारची असल्याचे व वक्फ मिळकत नसल्याचे पत्रात नमूद आहे.तहसिलदार यांनी प्रकरणात या कार्यालयाकडे सादर केलेल्या हस्तलिखित सातवारा च्या मालकी हक्कांत मूळ मालक दगडून इच्छावन, आनंदवन बापूवन व शंकरबन वापवन यांची प्रतिबंधित मालक अशी नोंद दिसून येते. खासरा पत्रक मध्ये कब्जेदार या रकान्यात दगडूवन इच्छावन, आनंदवन वापूवन व शंकरवन वायुवन यांच्या नावाची नोंद आहे. इनाम पत्रक मध्ये गट नंबर 36 ची नोंद असून सदर जमीन इनाम मदतमास असल्याची नोंद दिसून येते. तसेच प्रतिबंधित मालकीचा फेरफार मध्ये गट नंबर 36 हा गट खालसा झाल्याची दगडूबन इच्छावन, आनंदवन वापूवन व शंकरवन बापूवन यांची प्रतिबंधित मालक अशी नोंद दिसून आल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच त्यानुसार सदर जमीन इनाम मदतमाश असून प्रकरण कोणत्याही न्यायालयात प्रलंबित नाही. जमिनीवर शासकीय थकबाकी नाही. उक्त जमिनीचा अकृषिक वापर झालेला आहे. तसेच हस्तांतरण मध्ये शर्तभंग झालेला नाही, असा अहवाल सादर केल्याचे पत्रात नमूद आहे.\nतसेच प्रकरणात जिल्हा सहनिबंधक बीड यांचेकडून प्राप्त उक्त जमिनीचे चालू बाजारभावाप्रमाने श्रीम सुनंदा नामदेव गर्ज, रा आष्टी ता आष्टी जि. बीड यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 36 मधील क्षेत्र 0.07.05 हे. आर. चौमी क्षेत्राचे मुल्यांकन प्रमाणे होणारे एकूण मूल्यांकन रु. 20,32,965/- अक्षरी वीस लक्ष बत्तीस हजार नऊशे पासष्ट रुपये फक्त) इतके आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 17.08.2015 व दि. 24.09.2024 मधील तरतुदीनुसार चालू बाजार भावाच्या 5% पप्रमाणे होणारी रक्कम रु. 1,01,648/- अक्षरी एक लक्ष एक हजार सहाशे अडेचाळीस रुपये फक्त) देय आहे. सदर रक्कम अर्जदार यांनी चलन क्रमांक NO MH 011099808 202627 दिनांक 29.09.2026 भरणा दिनांक 30.09.2026 अन्वये शासन खात्यात जमा केलेली आहे. केल्याचे पत्रात नमूद आहे.\nत्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड, यांचेकडील आदेश क्र.2025/भुसूवि/इनाम/सुनंदा-गर्जे/कावि-871/65 दि.16/10/2026 अन्वये हैद्राबाद इनाम व रोख अनुदाने रद्द करणेबाबत अधिनियम, 1954 कलम 6(3) मर्धाल सुधारणा, महाराष्ट्र अधिनियम क्र.25 राजपत्र दिनांक. 17.08.2015 व सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.08 शासन राजपत्र दिनांक 24.09.2024, महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक. 03.03.2025, शासन निर्णय दिनांक. 31.12.2025 मधील तरतुदी अन्वये अर्जदार श्री सुनंदा नामदेव गर्जे, रा आष्टी ता आष्टी जि बीड यांचे मौजे आष्टी ता आष्टी जि बीड येथील गट नं. 36 मधील क्षेत्र 0.07.05 हे. आर. चौमी इनाम (मदतमाश) जमीन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यास परवानगी दिल्याचे पत्रात नमूद असल्याने फेरफार केला असे.\nकरिता नोंद सादर करत आहे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
